करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरात 12 जुलै पर्यंत एकही कोरोनाबाधित रुग्ण नव्हता. अगदी शेवटच्या टप्प्यात 12 जुलै नंतर कोरोनारुग्ण आढळून आले मात्र या टप्प्यात करमाळा शहरात माननीय आमदार संजय मामा शिंदे साहेब यांच्या पाठपुराव्याने ऑंटी जीन टेस्ट व आर टी पी सी आर टेस्ट आल्या, साहित्य उपलब्ध झाले आहे 12 जुलै ते 27 जुलै पर्यंत 36 पेशंट शोधणे त्याच्या सानिध्यातील हाय रिस्क व लो रिस्क असे तब्बल 1055 जणांच्या अँटीजीन व आरटीपीसीआर टेस्ट घेऊन करमाळा नगर परिषदेच्या मुख्याधिकारी वीणा पवार, कुटीर रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी श्री. अमोल डुकरे साहेब, कुटीर रुग्णालयाची स्टाफ, तालुका वैद्यकीय अधिकारी श्री. डॉ. घोगरे साहेब यांच्या टीमने मा. जिल्हाधिकारी साहेब श्री. मिलिंद शंभरकर, प्रांताधिकारी ज्योती कदम मॅडम, तहसीलदार श्री. समीर माने साहेब तसेच पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण 36 पेशंट व त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन, इन्स्टिट्यूट क्वारंटाईन करून, खूप कमी वेळेत कोव्हीड-19 ची टेस्ट घेतली. आज 36 पैकी 2 पेशंट बार्शी ते उपचार घेत आहेत, 1 पेशंट अनेक आजार व कोरोना यामुळे दुर्दैवाने मयत झाले आहेत मात्र 33 पेशंट पैकी 3 जणांना डिस्चार्ज मिळाला असून 30 पेशंट अतिशय चांगल्या पद्धतीने उपचार घेत आहेत व त्यांना कसल्याही प्रकारची लक्षणे व त्रास होत नसल्याने ते लवकर बरे होऊन आपल्या घरी जाणार असल्याचे मा. अध्यक्ष वैभवराजे जगताप यांनी सांगितले.
या बैठकीत करमाळा नगर परिषदेच्या मुख्याधिकारी, सर्व अधिकारी, पदाधिकारी, स्टाफ, सर्व करमाळा शहरातील शिक्षक, सफाई कर्मचारी गेल्या चार महिन्यापासून सातत्याने विविध कामे करत आहेत. सर्व स्टाफ यांनी केलेल्या कामाचे यावेळी मा. आमदार संजयमामा शिंदे साहेब यांनी तसेच मा.जिल्हाधिकारी साहेब मिलिंद शंभरकर यांनी कौतुक केले आहे. आतापर्यंत करमाळा नगरपरिषदेने केलेली कार्यवाही-
1) शहराचे सहा वेळा निर्जंतुकीकरण.
2) शहरात होमिओपॅथिक सेपिया 200 फवारणीचे तीन वेळा फवारणी.
3) मा .अध्यक्षांच्या वतीने अर्सनिक अल्बमच्या गोळ्यांचे, मास्क, सॅनिटायझर वाटप.
4) मा .अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण शहरात महा स्वच्छता करण्यात आली.
5) सर्व रुग्णालय, शासकीय रुग्णालय, सर्व कोव्हीड केअर सेंटर, शाळा, बँक, पोस्ट ऑफिस,क्वारंटाईन सेंटर यांचे नियमित निर्जंतुकीकरण करण्यात आले.
6) गर्दी नियंत्रण व भाजीपाला नियमित पुरवठा यासाठी जीन मैदानात भाजी मंडई स्थलांतर.
7) करमाळा नगर परिषदेच्या व करमाळा शहरातील शिक्षकांचे 8 पथक, प्रत्येक पथकात 20 जण असे 160 कर्मचारी, 100 सफाई कर्मचारी असे 260 कर्मचारी कोव्हीड योद्धा सहभागी.
8) दर 15 दिवसाला ईली, सारी,कोरोना प्राथमिक लक्ष्मणाचा सर्व्हे व नियमित जनजागृती, पोम्प्लेट वाटप ऑडिओ स्पीकरद्वारे जनजागृती केली जाते.
9) परगावाहून आलेल्या तब्बल 2000 पेक्षा जास्त व्यक्तींना क्वारंटाईन करून नियमित गस्त घालण्यात आली.
10) मृतदेहाचे आ.सी.एम.आर. मार्गदर्शनानुसार योग्य दफन / दहन विधी करण्यासाठी यंत्रणा सज्ज.
11)जीवनावश्यक वस्तूंची होम डिलिव्हरी पद्धत सुरू करण्यात आली.
12) कंटेंटमेंट झोन येते गस्त पथक, घरपोच माल पोचविणे, घंटागाडी याचे योग्य नियोजन करण्यात आले.
13) प्रतिबंधात्मक उपाय योजना करिता विविध दंडात्मक कारवाया, मास्क न लावणे, उघड्यावर थुंकणे इ. करिता करण्यात आल्या.
14)comorbid सर्व्हे , ज्येष्ठ नागरिक आरोग्य शिबिर, सर्व कर्मचाऱ्यांकरिता आरोग्य शिबिर,सर्व सरःक्षण साहित्य वाटप,रोज आंडि व सकस नाष्टा याचे नियोजन केले.
या सर्वांकरिता मा. अध्यक्ष वैभव राजे जगताप, उपाध्यक्ष अहमद चाचा कुरेशी सर्व पदाधिकारी यांनी प्रशासनाला मोलाचे सहकार्य व साथ दिली व अडचणी वर मात केली.
या सर्वात मा. मुख्याधिकारी वीणा पवार व त्यांचे कर्मचाऱ्यांनी यांनी खरोखर कोरोना योद्धा ही पदवी सार्थ ठरवली. मुख्याधिकारी यांनी 14 मार्च पासून प्रत्येक दिवस हा रात्रीचा दिवस केला, स्वतः फिल्डवर झोकून देऊन काम करून 260 जणांच्या स्टाफला योग्य मार्गदर्शन करून स्वतः अहोरात्र जनजागृती, प्रतिबंधात्मक उपाय योजना, कंटेंटमेंट झोन निर्मिती, संपर्क व्यक्तींचा शोध व तपासणी शहर स्वच्छता या कामे त्यांनी स्वतःला झोकून दिले मा. मुख्याधिकारी स्वतः फिल्डवर काम करत असल्याने कर्मचाऱ्यांचा धीर,धैर्य व मनोधैर्य उंचावले व सर्वांनी न डगमगता त्यांना साथ दिली व अतिशय कठीण परिस्थितीतून पदाधिकारी व प्रशासन यांना सर्व करमाळा करांच्या मदतीमुळे, सहनशीलतेमुळे, सहकार्यामुळे करमाळा शहर सुरक्षित ठेवण्यात यश मिळाले.
यापुढे सर्व नागरिकांना योग्य नियम पाळावेत, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, मास्क व सुरक्षित अंतराचा नियम पाळावा, कुठेतरी एकट्याने राहणे व
मनाने एकत्र राहणे या जीवन पद्धतीचा अवलंब करावा.कोरोनाला घाबरू नये मात्र गाफील ही राहू नये असे आवाहन मा.अध्यक्ष वैभवराजे जगताप यांनी यावेळी केले.
यासर्ल कामाचा आढावा मा.गृहराज्यमंञी शंभूराजे देसाई साहेब यांच्याकडे सादर केल्यानंतर त्यांनी करमाळा नगारपरीषदेच्या कामाचे विशेष कौतुक केले व पुढिल आव्हानाना सामोरे जाण्यासाठी त्यांचे अनुभवी मार्गदर्शन केले.
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…