करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील वांगी क्रमांक एक येथे उजनी धरणाच्या काठावर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे म्हणून लढा उभारलेले मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा दिनांक 15 नोव्हेंबर रोजी सभेचे नियोजन पूर्ण झाले आहे सभेचे व्यासपीठ उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे या सभेसाठी येणाऱ्या लोकांना दोन मुख्य मार्ग उपलब्ध असून टेंभुर्णी कडून येणाऱ्या लोकांना लोकविकास डेअरी पासून थेट वांगी नंबर एक येथे सभास्थळाकडे जाता येणार आहे. तर करमाळा मार्गे येणाऱ्या लोकांसाठी शेलगाव येथून वांगी नंबर तीन मार्गे सभा ठिकाणाकडे येता येईल. गावापासून पश्चिम दिशेला दीड किलोमीटर अंतरावर सभेचे ठिकाण असून दरम्यान तीन ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे गावापासून सभास्थानापर्यंत जाण्यासाठी पक्का रस्ता तयार करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून तो एक दिवसात पूर्ण होणार आहे. पार्किंगच्या ठिकाणी स्वच्छता व काटेरी झुडपे काढण्यासाठी स्वयंस्पर्तीने या परिसरातील दहा जे.सी.बी मशीन दोन दिवसापासून कार्यरत असून या रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतकऱ्यांचा ऊस तोडून या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सभा संध्याकाळच्या वेळी असल्याने सेवेच्या ठिकाणी व रस्त्याने लाईटची व्यवस्था करण्यात आलेली आहे आलेल्या लोकांच्या लोकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आले असून या सभेच्या नियोजनासाठी गावातील व या परिसरातील सातशे तरुण स्वयंसेवक स्वयंस्फूर्तीने काम करणार आहेत. सभा नियोजनासाठी केवळ मराठा सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते नाहीत तर इतर समाजाचेही कार्यकर्ते प्रयत्न करत असून 171एकर क्षेत्रावर होणाऱ्या या सभेसाठी 50 हजारापेक्षा जास्त लोक उपस्थित राहील असा अंदाज आयोजकांकडून व्यक्त केला जात आहे.आज प्रत्यक्ष सभेच्या ठिकाणी पाहणी केली मराठा बांधवांची वज्रमूठ बघुन अभिमान वाटला यावेळी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक पांडुरंग आबा जाधव पत्रकार मित्र धनंजय पाटील गंजेद्र पोळ प्रशांत नाईकनवरे दत्ता देशमुख आदी बांधव उपस्थित होते.
करमाळा प्रतिनिधी निमगाव (टें.) येथील आदर्श सरपंच तथा विठ्ठल कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक श्री. यशवंत संजयमामा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील कमलाभवानी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य श्री. बाळासाहेब…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा सुरेश पिसे (वय ७१) यांचे अल्पशा…
करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…
करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…