Categories: करमाळा

गोंडरे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आ. संजयमामा शिंदे यांचा बालेकिल्ला राखल्याबद्दल सुभाष हानपुडे यांचा भरत भाऊ आवताडे यांच्या हस्ते सत्कार

करमाळा प्रतिनिधी गौंडरे ग्रामपंचायतीची निवडणूक अंत्यंत चुरशीची झाली असून प्रतिस्पर्धी नारायण आबा पाटील गट बागल गट यांचे स्वतंत्र्पॅनल असताना सरपंच पदी उमेदवार उभा होते अशा परिस्थितीमध्येही संजय मामा शिंदे समर्थक माजी सरपंच सुभाष हानपुडे यांनी मागील पाच वर्षांमध्ये गावामध्ये चांगली विकास कामे केल्यामुळे जनतेने त्यांच्या कामाची पोचपावती म्हणून यांच्या पत्नी सौ तारामती सुभाष हानपुडे यांची सर्वाधिक 695 मते मिळवून बहुमताने निवड केली आहे ग्रामपंचायत सदस्य पदी संजय मामा शिंदे गटाच्या सो मनिषा अरुण उघडे या 258 मते‌ मिळवुन विजयी झाल्या आहेत. सुभाष हानपूडे यांनी संजय मामा शिंदे गटाचे समर्थक म्हणून आपला बालेकिल्ला राखून ठेवला आहे. सरपंचपदी ग्रामपंचायत सदस्य पदी निवड झाल्याबद्दल संजय मामा शिंदे समर्थक पूर्व भागाचे नेते उद्योजक भरत भाऊ अवताडे यांच्या हस्ते मानाचा फेटा श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. गौंडरे ग्रामपंचायत पारंपरिक पाटील गट बागल गट यांचा बालेकिल्ला असताना गौंडरे ग्रामपंचायत मध्ये सरपंच पदी संजय मामा शिंदे गटाचे सुभाष हानपुडे यांच्या पत्नी सरपंच झाल्या असून एक ग्रामपंचायत सदस्य झाल्याने संजय मामा शिंदे गटाने येथे पुन्हा एकदा ग्रामपंचायतच्या निवडणुकीच्या निम्मिताने आपले वर्चस्व सिध्द केले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

18 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

21 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

23 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago