करमाळा प्रतिनिधी ओबीसी इतर मागासवर्ग व आर्थिक दृष्ट्या मागास (EWS) प्रवगातील मुलींच्या सर्व अभ्यासक्रमाची शंभर टक्के शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती शासनामार्फत करण्यात येईल ओबीसी इतर मागासवर्ग व आर्थिक दृष्ट्या मागास प्रवगातील मुलींच्या सर्व अभ्यासक्रमाची शंभर टक्के शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती शासनामार्फत करण्यात येईल अशी शिफारस आरक्षण उपसमितीने केली असुन याकरिता एक हजार कोटीची तरतूद करण्यात आली आहे. दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक रामदास झोळसर याबाबत राज्य शासनाकडे शैक्षणिक सोयी सवलती इतर समाजाप्रमाणे ओबीसी व मराठा समाजातील विद्यार्थ्यांनीही ई डब्ल्यू एस खाली देण्यात याव्यात अशी मागणी केली होती .या मागणीला यश आले आहे .राज्य शासनाने आता इतर मागास प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या मागास EWS मधील विद्यार्थ्यांची संपूर्ण शैक्षणिक शुल्क देणार आहे ही मागणी मुलींच्या शिक्षणासाठी पूर्ण करण्यात आली असून आपल्या मागणीला 50 टक्के यश आले आहे. शासनाकडून पूर्वी 50 टक्के सवलत देण्यात येत होती आता पूर्ण शंभर टक्के शैक्षणिक फीची पूर्तता शासनमार्फत करण्यात येणार आहे. मुलींप्रमाणे मुलांनाही या सवलती लागू करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उच्च शिक्षण तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे त्यांनी केली आहे .मराठा समाजाला नुसते आरक्षण देऊन उपयोग नाही तर शैक्षणिक सोयी सवलती देण्यात यावे अशी मागणी वेळोवेळी शासनाकडे केली असल्याने त्यांच्या या मागणीची दखल राज्य शासनाने घेतली आहे .मुलांसाठीही शैक्षणिक सवलत शासनातर्फे मिळावी यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. ओबीसी व आर्थिक मागास प्रवर्गातील EWS मराठा समाजातील मुलींचेहशंभर टक्के शुल्क शैक्षणिक शुल्क शासन भरणार असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उच्च शिक्षण तंत्रमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचे प्राध्यापक रामदास झोळसर सर यांनी अभिनंदन केले आहे . राज्य शासनामार्फत हळूहळू का होईना शैक्षणिक सवलती मिळत असल्याने खऱ्या अर्थाने समाजातील गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणात याचा लाभ होणार असल्याने आपण याबाबत समाधानी असल्याचे त्यांनी सांगितले आहे.