करमाळा प्रतिनिधी हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेची स्थापना केली सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून दिला. शिवसेनेचा आवाज आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत पोचला असून त्यांच्या कार्याला मानवंदना देऊन त्यांचे कार्य पुढे नेणे हीच खरी त्यांना मानवंदना असेल असे मत शिवसेना युवा सेना करमाळा तालुकाप्रमुख राहुल कानगुडे यांनी व्यक्त केले. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या अकराव्या स्मृतिदिनानिमित्त बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या स्मृतीस उजळा देऊन त्यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी पुढे बोलताना राहुल कानगुडे म्हणाले की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श मनामध्ये ठेवून शिवसेनेचा सच्चा लोकनेता असणाऱ्या धर्मवीर आनंद दिघे यांच्याप्रमाणेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्य जनता व कार्यकर्त्याला न्याय मिळवून असून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा विचाराचा वारसा ते जपत आहे करमाळा तालुक्यामध्ये आपणही शिवसेनेचा विचार प्रत्येक घराघरात गावागावात पोहोचण्यासाठी जिल्हाप्रमुख महेश चिवटे वैद्यकीय राज्य कक्षाचे प्रमुख मंगेशचिवटे यांच्या माध्यमातून जनसेवेचे कार्य जोमाने सुरू आहे.या कार्यक्रमास शिवसेनेचे जिल्हा समन्वयक निखिल चांदगुडे उपतालुकाप्रमुख दादासाहेब तनपुरे शहर प्रमुख विशाल गायकवाड सहकार सेना प्रमुख श्रीकांत गोसावी शिवसेना कार्यकर्ते सचिन कानगुडे दिगंबर कानगुडे विनोद पडवळे अजिंक्य काळे समीर शेख आदी जण उपस्थित होते.