Categories: करमाळा

‘वेंगुर्ला पॅटर्नमुळे अनेक पुरस्कार मिळाले पण करमाळा तालुका फ्रेंड सर्कलच्यावतीने मिळालेला पुरस्कार म्हणजे कुटुंबाकडून मिळालेली कौतुकाची थाप-रामदास कोकरे

करमाळा प्रतिनिधी स्वच्छ्ता हीच सेवा या कामात झोकून  स्वच्छतेमध्ये ‘वेंगुर्ला पॅटर्न’ तयार करुन प्लास्टिक बॅग मुक्ती, घणकचऱ्यापासून वीज निर्मिती आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल अनेक पुरस्कार मिळाले पण आपल्या गावाचा करमाळा तालुका फ्रेंड सर्कलच्यावतीने मिळालेला पुरस्कार म्हणजे कुटुंबाकडून मिळालेली कौतुकाची थाप असल्याचे मत लातूर प्रशासन नगरपालिकेच्या आयुक्त रामदास कोकरे यांनी व्यक्त केले.रामदास कोकरे यांना आतापर्यंत वसुंधरा मित्र पुरस्कार, UNDP, आयकॉन अवॉर्ड, इंडीयन गलोरी अवार्ड, यंग रिसर्चर अवॉर्ड असे 40 हून अधिक पुरस्कार मिळाले आहेत. परंतु आज करमाळा तालुका फ्रेंड सर्कल कडून पुरस्कार मिळालेला आनंद खूप आहे, असे रामदास कोकरे म्हणाले. करमाळा तालुका फ्रेंड सर्कल चा तिसरा स्नेहमेळावा संपन्न झाला, यावेळी करमाळा तालुक्यातील सर्व अधिकारी, उद्योजक, शिक्षण क्षेत्रातील आणि शेतकरी उपस्थीत होते. यावेळी लातूर नगरपरिषद प्रशासन आयुक्त श्री रामदास कोकरे साहेब यांना करमाळा मित्र पुरस्कार पणनचे सहसंचालक मोहनजी निंबाळकर साहेब, व्हाइस प्रसिडेंट सचिन शहा, बारामतीचे चीफ ऑफिसर महेशजी रोकडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, यावेळी करमाळा तालुका फ्रेंड सर्कलच्या वतीने शालेय पोषण आहार अधिकक्षक संतोष फाटके साहेब, विकास सरडे, राज्यकर अधिकारी सुधीर आडसुळ, बिडिओ मनोज राऊत, संतोष रणदिवे, पोलिस निरीक्षक संतोष बोराटे, मधूकर सूर्वे, दत्तात्रय पवार, उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे, गणेश मार्कड, अर्जुन शेळके यांच्या हस्ते 14 सायकलीचे मुलींना वाटप करण्यात आले, समर्पण कादंबरी लेखक महेद्र पेटकर, चित्रपट निर्माता मंगेश बदर, चार्टर्ड अकाउंटंट भरत जाधव, सॉफ्टवेअर इंजिनियर क्षितिज भोसले, मागील वर्षी mpsc आणि upsc मध्ये यशस्वी झालेल्यांचे सत्कार करण्यात आला. अभिजित ढेरे पोलिस उपनरीक्षक, अमित लबडे पोलिस उपनिरीक्षक, दत्ता मिसाळ, आणि एवरेस्ट सर केलेले शिवाजी ननावरे, API, pune यांचाही सत्कार झाला. शिक्षण क्षेत्रातील प्रा. मालोजीराजे भोसले ,श्रीकांत भोसले, लक्ष्मण राख रणजित जाधव, उद्योजक राहुल यादव, सुनील यादव , उमेश पवार, संजय भालेराव, शशिकांत शेजुळ, ॲड सचिन लोंढे, डॉ मयूर नवले, जयंत देशमुख, सुरेश भोसले, सयाजीराजे ओंभासे, आजित कणसे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन राज्यकर आयुक्त संतोष लोंढे साहेब, पोलिस निरिक्षक सचिन वांगडे, उपजिल्हाधकारी रामहरी भोसले साहेब, राजेंद्र वारगड साहेब यांनी केले होते, यावेळी आभार प्रदर्शन ॲड सुहास मोरे आणि सूत्र संचालन नितीन आढाव पाटील यांनी केले.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा तालुक्यात महावितरणविरोधात संतापाचा भडका: जेऊर कार्यालयासमोर १८ सप्टेंबरला भव्य धरणे आंदोलन; शंभूराजे जगताप यांचे शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन

​करमाळा: प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…

12 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

1 day ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

1 day ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

2 days ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

3 days ago