करमाळा नगरपरिषदेने शहरात मोकाट फिरणारे भटक्या कुत्र्याचा बंदोबस्त करावा अन्यथा शुक्रवार दिनांक २४ नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता करमाळा नगरपालिका मध्ये भटके कुत्रे आणुन सोडु असा इशारा सोलापुर जिल्हा काॅग्रेस चे माजी सरचिटणीस सुनील बापू सावंत यांनी लेखी निवेदनाव्दारे मुख्याधिकारी बालाजी लोंढे यांना दिले आहे.
यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,करमाळा शहरात मोकाट कुत्रांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असुन शहरातील गल्ली बोळात असणारे भटके कुत्रे लहान मुलांना चावत आहे तर रात्री अपरात्री नागरीकांना रस्त्यावरुन जाताना अंगावर येऊन जखमी करत असल्याचे शहरात दिसत आहे आता शाळा सुरु होणार असुन लहान लहान मुले शाळेत जाताना भटके कुत्रे मुलांवर हल्ला करण्याची शक्यता नाकारता येणार नाही त्यामुळे वेळीच या भटक्या कुत्र्याचा बंदोबस्त करावा तसेच सदर कुत्र्याचे निंर्बीजीकरण करण्यात यावे असे या निवेदनात म्हटले आहे सदर निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी सोलापुर व पोलीस निरीक्षक करमाळा यांना दिले आहे.
करमाळा: प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…
करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…
करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…
करमाळा प्रतिनिधी — गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव म्हणून साजरा न करता त्याला सामाजिक बांधिलकीची…
करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…
* करमाळा प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…