Categories: करमाळा

श्री मकाई सहकारी कारखान्याचे ऊस बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ जमा न केल्यास 28 नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालयावर बोंबाबोब आंदोलन- प्रा. रामदास झोळ सर

करमाळा प्रतिनिधी श्री मकाई सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्याच्या उसाची बिल मागील वर्षीपासून दिले नसल्यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची पाळी आल्यामुळे असंतोषचे वातावरण निर्माण झाले असून शेतकऱ्याची ऊस बिल तात्काळ खात्यावर जमा न केल्यास 28 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता करमाळा तहसील कार्यालयावर बोंबाबोंब आंदोलन करणार असल्याची माहिती प्राध्यापक रामदास झोळसर यांनी दिली आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार करमाळा यांना देण्यात आले आहे. सदर निवेदनात असे म्हटले आहे की श्री मकाई सहकारी साखर कारखाना भिलारवाडी यांचे सन 2022 -23 मध्ये एक लाख 59 हजार टन एवढे ऊसाचे गाळप झाले असूनही त्या गाळप झालेल्या उसाची बिल एक वर्षे उलटूनही अद्यापही कारखान्याने शेतकऱ्यांना दिलेले नाही. याबाबत माननीय सहकार आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांनी कारखान्यावर आर आर सी ची कारवाई करण्यासाठी आपण त्यांना सुचित केले होते. त्यानुसार साखर आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हाधिकारी सोलापूर प्रादेशिक सहसंचालक साखर सोलापूर कार्यालयाने कारवाई करून थकीत एफ आर पी ची रक्कम 26 कोटी रुपये एवढा बोजा संबंधित मकाई कारखान्याच्या मालमत्तेवर चढवलेला असल्याचे असे समजले आहे व लेखापरीक्षक वर्ग १ सहकार विभाग यांनी केलेल्या पडताळणीमध्ये असे लक्षात आले आहे. की संबंधित कारखान्यांमध्ये कोणतेही प्रकारचे मोलिसिस बागेची इत्यादी शिल्लक ठेवलेले नाही. त्याची संपूर्ण विक्री केलेली आहे तसेच तयार झालेल्या सर्व साखरेची विक्री केलेली आहे मग पैसे गेले कुठे फक्त दोन लाख 75 हजार ची साखर कारखान्यामध्ये शिल्लक आहे संबंधित कारखान्याच्या विविध बँकांमध्ये असलेल्या चालू सेव्हिंग खात्यामध्ये दोन कोटी साठ लाख रुपये शिल्लक आहे .परिणामी कारखान्याला वारंवार वागणी करूनही द्वितीय लेखापरीक्षक वर्ग एक तहसीलदार करमाळा प्रादेशिक सहसंचालक साखर कार्यालय सोलापूर अधिकाऱ्यांनी वारंवार मागणी करूनही संबंधित कारखान्यांनी शिल्लक असलेल्या दोन कोटी साठ लाख रुपये एवढ्या रकमेचा तपशील दिलेला नाही तसेच ऊस पुरवठदार शेतकऱ्यांची यादी त्यांनी उसाच्या टनाबाबत तपशील ही गुलदस्त्यात आहे. विविध बँका त्यामध्ये शिल्लक असलेले दोन कोटी साठ लाख रुपये शिल्लक रक्कम ही तरी शेतकऱ्याला वाटली जात नाही तरी संदर्भात संबंधित शेतकरी संघटना सर्व सभासद शेतकरी यांनी प्रादेशिक सहसंचालक साखर कार्यालय सोलापूर तहसीलदार करमाळा यांनी कळवलेले आहे. या थकीत ऊस बिलाच्या संदर्भात प्राध्यापक राजेश गायकवाड ही शेतकरी उपोषणाला बसले असता कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन स्थळी जाऊन लवकरात लवकर म्हणजेच 25 नोव्हेंबर रोजी 2023 पर्यंत बिल देण्याचे आश्वासन दिले आहे. यापूर्वी बऱ्याच वेळा अशा प्रकारची पत्रे संबंधित कारखाना पदाधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या तारखांना यापूर्वी संबंधित प्रशासकीय कार्यालयांना दिलेले असून ही सभासद शेतकऱ्यांची खात्यावर बिले होताना दिसत नाही तरी सर्व घटनांचा सखोल अभ्यास केला असता असे दिसून येते की संबंधित कारखान्याचे तत्कालीन संचालक व पदाधिकाऱ्यांनी ऊस पुरवठादार शेतकऱ्याची घोर फसवणूक केलेली आहे. माननीय सहकार आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे सोलापूर जिल्हाधिकारी प्रादेशिक सहसंचालक साखर कार्यालय सोलापूर तहसीलदार करमाळा अधिकाऱ्यांनी लेखी पत्रद्वारे अगर अन्य मार्गाने आदेश वजा सूचना करूनही उपरोक्त कार्यालयाच्या कारवाईला त्या कारखान्याचे संचालक पदाधिकारी भीक घालत नसल्याचे लक्षात आले आहे. आम्ही सर्व शेतकरी बांधव आपणास लेखी पत्राद्वारे विनंती करतो की ऊस बिले जमा करण्यात जबाबदार असणाऱ्या संबंधित कारखान्याच्या  पदाधिकाऱ्यांवर फसवणुकीचा प्रकार केल्याने कारवाई करण्यात यावी तथापी तसे न झाल्यास आम्ही 28 नोव्हेंबर 2023 पासून करमाळा तहसील कार्यालयासमोर आंदोलन करणार आहोत यंदाच्या वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे दिनांक २० नोव्हेंबर 2023 च्या सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निर्णयानुसार करमाळा तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून जाहीर झालेला आहे. खरीप व रब्बी हंगामाचे पिकाची उत्पन्न शेतकऱ्यांच्या हाती लागण्याची आशा मावळली आहे. शेतकऱ्याकडूनही सामूहिक वैयक्तिकरित्या टोकाचे पाऊल उचलण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा गंभीर परिस्थितीचा विचार करून आपण या जातीने लक्ष घालून संबंधित कारखाने सभासद शेतकऱ्याची बिले लवकरात लवकर खात्यावर जमा करण्याची हेतूने कारखान्याच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची विनंती करण्यात आली आहे. याबाबतचे नियोजन साखर आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे ,माननीय साखर सहसंचालक साखर कार्यालय सोलापूर जिल्हाधिकारीसाहेब सोलापूर यांना पाठवण्यात आले आहे. सदर निवेदनावर प्राध्यापक रामदास झोळसर कामगार नेते दशरथ आण्णा कांबळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र गोडगे एडवोकेट राहुल सावंत प्राध्यापक श्री राजेश गायकवाड राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री अंगद देवकते ,शेतकरी विकास मेरगळ, लालासाहेब काळे, देविदास गायकवाड, लालासाहेब काळे यांच्यासह शेतकरी बांधवांच्या सह्या आहेत. याबाबत गांभीर्याने दखल घेऊन प्रशासनाने तात्काळ मकाई सहकारी साखर कारखान्याच्या बाबत गांभीर्याने दखल घेऊन शेतकऱ्याच्या खात्यावर बिले जमा करण्यासाठी कारखान्याला तसे सुचित करण्यात यावे अन्यथा 28 नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचे प्रा. रामदास झोळसर यांनी सांगितले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा

करमाळा प्रतिनिधी दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात…

8 hours ago

पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलासाठी ग्रीन झोनमध्ये 2 गुंठे क्षेत्राला बांधकाम परवाना द्यावा. अन्यथा 26 जानेवारी रोजी मा. सभापती सतीश सावंत यांचा उपोषणाचा इशारा

  सांगोला प्रतिनिधी सांगोला नगरपालिका हद्दीमध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलाला दोन गुंठ्यापर्यंत बांधकाम परवाना व…

9 hours ago

भाजप युवा मोर्चाच्या करमाळा तालुकाध्यक्षपदी शुभम बंडगर यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…

1 day ago

कोल्हापूरच्या पावणे चार वर्षाच्या साम्राज्य मराठे ची सह्याद्रीतील सर्वात कठीण लिंगाणा सुळक्यावर चढाई.

कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे,…

2 days ago

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माजी आमदार देशभक्त नामदेवरावजी जगताप यांची १०५ वी जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप…

2 days ago

करमाळा तालुक्यातील पत्रकारीता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असल्याने त्यांना सन्मानित करण्याचा ‌ सार्थ अभिमान- भरत भाऊ आवताडे

करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून करमाळा तालुक्यातील पत्रकारिता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असून…

2 days ago