करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील महत्वाची ग्रामपंचायत केत्तुरच्या उपसरपंचपदी श्री. भास्कर कोकणे यांची आज अविरोध निवड करण्यात आली. केत्तुर ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत स्थानिक किर्तेश्वर ग्रामविकास पॅनल आणि किर्तेश्वर ग्रामविकास आघाडी यांच्यात लढत झाली होती. किर्तेश्वर ग्रामविकास पॅनलने बाजी मारत सरपंच पदाचे उमेदवार सचिन वेळेकर यांचेसह दहा जागा जिंकल्या असुन किर्तेश्वर ग्रामविकास आघाडीला केवळ एक जागा मिळाली आहे. किर्तेश्वर ग्रामविकास पॅनलचे नेतृत्व पंचायत समितीचे माजी सभापती बापुसाहेब पाटील, माजी सरपंच देवराव नवले, जिल्हा दुध संघाचे संचालक राजेंद्रसिंह पाटील,आदिनाथ चे माजी संचालक संतोष पाटील, माजी सरपंच ॲड. अजित विघ्ने, मकाई कारखान्याचे कार्य. संचालक हरिश खाटमोडे- पाटील, माजी उपसरपंच संतोष निकम, लालासाहेब कोकणे, दत्ता कोकणे, भिमराव येडे,अॅड. विकास जरांडे , बाळासाहेब जरांडे , शहाजी पाटील, प्रशांत नवले ,आबासो ठोंबरे यांनी केले होते. किर्तेश्वर ग्रामविकास पॅनलच्या प्रभाग तीन आणि चार मधील पाच जागा निवडणुकी पुर्वीच अविरोध होऊन त्यामधे सौ. शुभांगी रविंद्र विघ्ने, सौ. प्रियंका प्रशांत नवले, श्री. बबन इश्वर साळवे, श्री. शहाजी मारुती पाटील, श्री. रामहरी कोंडीबा जरांडे यांची निवड झाली असुन प्रभाग क्रमांक १ मधुन भास्कर कोकणे, सौ .सुवर्णा गुलमर, सौ. अश्विनी कानतोडे आणि प्रभाग-२ मधुन सुजीत पाटील , सौ.कमल पवार, सौ. पुजा कनिचे हे सदस्य म्हणुन निवडुन आले आहेत. सरपंच पदी सचिन वेळेकर हे निवडुन आले असुन,आज दिनांक-२३/११/२०२३ रोजी उपसरपंच पदाचे झालेल्या निवडणुकांमध्ये किर्तेश्वर ग्रामविकास पॅनलचे भास्कर कोकणे यांची उपसरपंच पदी बहुमताने अविरोध निवड करण्यात आली . यावेळी ज्येष्ठ नेते बापुसाहेब पाटील, भिमराव येडे, नवनाथ राऊत,राजेंद्रसिंह पाटील,अँड. विकास जरांडे, बाळासाहेब कोकणे, संतोष पाटील, हरिष खाटमोडे पाटील, महावीर राऊत, छगन मिंड, अनिल राऊत( वस्ताद), हनुमंत राऊत, डॉ. रॉय, लक्ष्मीकांत पाटील, चेअरमन दत्ता कोकणे, रविंद्र विघ्ने, प्रविण नवले, चेअरमन डिंगाबर नाझरकर, सोपानदेव खोडवे,दत्ता कनिचे, पै सागर पवार,व सर्व उपस्थित ग्रामस्थांचे हस्ते नुतन सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सन्मान करण्यात आला .यावेळी दोन वाजता सरपंच ,उपसरपंच व सदस्यांची ग्रामपंचायत कार्यालयात निवडणुक अधिकारी म्हेत्रे साहेब , ग्रामविकास अधिकारी शरद जगदाळे यांचे मार्गदर्शनाखाली मिटींग पार पडली. यावेळी श्री. म्हेत्रे साहेब यांनी उपस्थितांना बहुमोल मार्गदर्शन केले व नुतन सरपंच उपसरपंच व सदस्यांचे अभिनंदन केले.