करमाळा प्रतिनिधी मकाई सहकारी साखर कारखान्याची ऊस बिल तात्काळ मिळावे याकरिता प्रा. रामदास झोळ सर यांच्या नेतृत्वाखाली करमाळा तहसील कार्यालयावर बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. मकाई सहकारी साखर कारखान्याची ऊस बिल जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहणार असल्याची प्राध्यापक रामदास झोळसर यांनी सांगितले आहे. गेल्या वर्षभरापासून मकाई सहकारी साखर कारखान्याकडे शेतकरी सभासदाची गेल्या वर्षीचे ऊस बिल बाकी असून गेल्या वर्षी उत्पादित साखर माॕलीसिस बॅगस साखरेचे पैसे कुठे गेले असा सवाल मकाई सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांनी करत संबंधित कारखान्याच्या चेअरमन व संचालक मंडळावर गुन्हे दाखल करून त्यांच्या मालमत्तेवर बोजा चढवण्यात यावा अशी मागणी प्रशासनाकडे केली असून सदर बाबत प्रशासनाचे जिल्हाधिकारी प्रभारी तहसीलदार विजयकुमार जाधव प्रांतधिकारी नायब तहसीलदार दादा गायकवाड यांच्याकडे मागणी केली आहे.यावेळी प्राध्यापक रामदास झोळ सर कामगार नेते दशरथ आण्णा कांबळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रवींद्र गोडगे ॲड राहुल सावंत, अंजनडोह माजी उपसरपंच शहाजी माने, शेतकरी संघटनेचे सुदर्शन शेळके, हरीभाऊ झिंजाडे,विठ्ठलराव शिंदे.प्रा.राजेश गायकवाड,मा.सरपंच भगवान डोंबाळे, हरिदास मोरे ,अक्षय घुमरे शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते शेतकरी मोठया संख्येंने उपस्थित होते.यावेळी दशरथ आण्णा कांबळे म्हणाले की शेतकरी कामगार यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही आंदोलनात सहभागी झालो असुन शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण कार्यरत राहणार असल्याचे सांगितले. यावेळी ॲड राहुल सावंत म्हणाले की शेतकरी प्रश्नाविषयी आम्ही या लढाईत सहभागी झालो असुन जोपर्यंत शेतकऱ्यांना ऊस बिल मिळत नाही तोपर्यंत बिल मिळवून देण्यासाठी लढा तीव्र करणार असल्याचे त्यांनी सांगितले.मकाई सहकारी साखर कारखान्याची ऊस बिल वारंवार तारखा देऊनही मिळत नसल्याच्या कारणावरून प्रभारी तहसीलदार विजयकुमार जाधव यांच्याशी ॲड राहुल सावंत यांनी चर्चा करून साखर आयुक्त यांच्याशी संवाद साधला ऊस बिल का मिळत नाही याबाबत विचारणा केली आपण मकाई सहकारी साखर कारखान्याची चेअरमन सर्व संचालक यांच्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करून कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली असता साखर आयुक्त यांनी प्रशासनाकडून योग्य ती माहिती घेऊन आपण कारवाई करणार असल्याचे सांगितले. मकाईचे थकीत ऊस बिल मिळत नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या मुलांचे लग्न ,दवाखाना, शिक्षण संसाराचा गाडा चालवण्यासाठी अनेकांनी खाजगी सावकाराकडून कर्ज घेतले असल्यामुळे या शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ आली असून अशा शेतकऱ्यांचा संयमाचा बांध तुटल्यामुळे तरटगावचे हरिदास मोरे यां शेतकऱ्यांनी आपल्या अंगावर पेट्रोल टाकुन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे एपी आय जगदाळे त्यांच्या सहकाऱ्यांनी योग्य वेळी या शेतकऱ्यांना समजावून सांगत आत्मदहन करण्यापासून परावृत केले आहे. एकंदर मकाई सहकारी साखर कारखान्याचे ऊस बिल आंदोलन पेटले असून आता खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचा संयमाचा बांध तुटला असून मकाई सहकारी साखर कारखान्या विषयी प्रचंड राग सभासदांमध्ये व्यक्त होत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे .घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रांतधिकारी प्रियाँका आंबेकर मॅडम कुर्डूवाडी येथून तात्काळ करमाळा येथे येऊन त्यांनी आंदोलकांची भेट घेत प्रशासनाची वतीने सहकार्य करण्याची भूमिका मांडली. त्यामुळे याबाबत प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी साखर आयुक्त यांनी योग्य ती कारवाई करून मकाई सहकारी साखर कारखान्याची ऊस बिल तात्काळ मिळण्या कामी संबंधितावर कारवाई करण्याची मागणी प्राध्यापक रामदास झोळसर यांनी केली आहे.