Categories: करमाळा

कुणबीचे दाखले मराठा समाजा बरोबर मुस्लीम समाजाला देण्याची मागणी


करमाळा प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून कुणबी दाखले जुन्या नोंदी पाहण्यासाठी व अभ्यास करण्यासाठी शिंदे समिती स्थापन केली होती. शिंदे समितीच्या माध्यमातून जुन्या महसुली नोंदी पाहण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व तहसील कार्यालयात शोध मोहीम चालू असुन ते शोधत असताना निजामकालीन दस्तऐवज किंवा जन्म मृत्यू दाखले, शाळेचे दाखले व इतर महसुली नोंदी मध्ये मराठा समाजाच्या नोंदी बरोबर मुस्लीम समाजातील नागरिकांच्या जुन्या महसुली नोंदी मध्ये कुणबी – मुस्लीम असा उल्लेख असलेल्या नोंदी आढळून आल्या आहेत. त्यामुळे मुस्लीम समाजातील ज्या नागरिकांच्या जुन्या महसुली नोंदी मध्ये कुणबी – मराठा बरोबर कुणबी – मुस्लीम असा जातीचा दाखला सुद्धा देण्यात यावा व मुस्लीम समाजातील या नोंदी ग्राह्य धरुन मुस्लीम समाजाला सुद्धा न्याय देण्यात यावा व त्यांना या सर्व सवलती आमच्या मराठा समाजातील बंधु प्रमाणेच मुस्लीम समाजाला सुद्धा या सर्व सवलती मिळाव्यात त्यांनी यापासून वंचित ठेवु नये अशी मागणी भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाउंडेशन व सकल मुस्लीम समाज करमाळा यांच्या माध्यमातून महाराष्ट्रा राज्य सरकारला मागणी करत असल्याचे सांगितले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

16 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

19 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

21 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago