करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्याचे उद्योजक क्लासिक ऑईल कंपनीचे मालक राजुरी गावचे भुषण संतोष काका कुलकर्णी यांचे कार्य युवा पिढीसाठी प्रेरणादायी असून प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या संतोष काका कुलकर्णी यांचा आदर्श घेऊन युवा पिढीनी वाटचाल करावी असे मत राजुरीचे सरपंच राजेंद्र भोसले यांनी व्यक्त केले. संतोष काका कुलकर्णी यांच्या 56 वा वाढदिवस राजुरी ग्रामस्थाच्याकडुन साजरा करण्यात आला.राजुरी गावच्या विकासासाठी संतोष काका कुलकर्णी यांचे महत्वाचे योगदानअसुन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गावाचा सर्वागिण विकास होत असल्याचे आबासाहेब टापरे यांनी व्यक्त केले. समाजसेवेचे कार्य चालू ठेवुन युवापिढीला मार्गदर्शन करण्याचे आवाहन त्यांनी केले. संतोष काका कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी करमाळा तालुक्यात उद्योजक निर्माण होण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील असून करमाळा तालुक्यात उद्योग उभारण्यासाठी आपण कार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आमचा तालुक्यातील मित्र मंडळीचा ग्रुप हा राजकीय नसून एकमेकांच्या सुखदुःखात सदैव सामील राहणारा हा ग्रुप आहे त्यामुळे गावातील कुठलेही कार्यकर्त्यांना कोणतेही काम करण्यास कसलीही अडचण येत नाही या कार्यक्रमाचे आयोजन राजुरी येथील ग्रामपंचायत मा.आ. नारायण आबा पाटिल गटाचे कार्यकर्ते नूतन सरपंच राजेंद्र भोसले,एकनाथ शिंदे,बंडु गुरूजी,आबासाहेब टापरे.बंडु शिंदे, गणेश जाधव ,सुनील काका कुलकर्णी, रामभाऊ शिंदे, सचिन काका कुलकर्णी, हनुमंत जगताप, श्रीकांत साखरे, जालिंदर भाऊसाहेब दुरंदे, शिवाजी जाधव ,बापू साखरे, गजेंद्र भोसले, रसूल भाई निखिल बरुटे, माऊली चिंचकर,निलेश गंधे, यांनी केले