Categories: करमाळा

दहिगाव उपसा सिंचन योजना बंदनलिका वितरण प्रणाली कामाचा उद्या 5 डिसेंबर रोजी भूमिपूजन समारंभ आमदार संजयमामा शिंदे यांचे शुभहस्ते व माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या उपस्थितीत संपन्न होणार


करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्याच्या पूर्व भागाची वरदायिनी असलेल्या दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या बंदनलिका वितरण प्रणाली कामाचे भूमिपूजन उद्या 5 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10.30 वाजता होणार असल्याची माहिती करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली.
याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, दहिगाव उपसा सिंचन योजना ही 1996 साली मंजूर झालेली योजना होती. या योजनेची चारी आणि उपचारी यांची कामे अपूर्ण असल्यामुळे लाभक्षेत्रातील जवळपास 5 हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येण्यापासून वंचित होते. या वंचित असलेल्या क्षेत्राला दहिगाव योजनेच्या पाण्याचा लाभ मिळावा यासाठी आपण दहिगाव उपसा सिंचन योजनेची दुसरी सुधारित प्रशासकीय मान्यता घेतली. त्यानंतर 2020 पासून 2023 पर्यंतच्या अर्थसंकल्पामध्ये जवळपास 109 कोटी निधीची तरतूद दहिगाव उपसा सिंचन योजनेसाठी केल्यामुळे दहिगाव योजनेच्या 27 वितरिका, 99 उपवितरीका व 19 थेट विमचक यांची अपूर्ण असलेली कामे केली जाणार आहेत.
या सर्वच कामांचे 101.34 कोटी कामांची निविदा आपण काढली असून सदर काम द इंडियन ह्युम पाईप कं लिमिटेड मुंबई या कंपनीला मिळाले आहे. योजनेची अपूर्ण कामे पूर्ण झाल्यानंतर 10 हजार 804 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे .त्याचबरोबर दहिगाव योजनेला मंजूर असलेल्या 1.81टीएमसी पैकी 0.46 टीएमसी पाण्याची बचती होणार आहे त्याचा फायदा योजनेच्या लाभक्षेत्रातील इतर गावांना पाणी देण्यासाठी होणार आहे.
सदर योजनेच्या या कामाचे भूमिपूजन उद्या 5 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10.30 वाजता होणार असून या कार्यक्रमासाठी योजनेच्या लाभ क्षेत्रातील जेऊरवाडी, कुंभेज, खडकेवाडी, गुळसडी ,देवळाली, पांडे ,अर्जुननगर ,हिसरे, शेलगाव कडेवळी, फिसरे, सरपडोह, सौंदे, सालसे, आळसुंदे, साडे, वरकटणे , कोंढेज ,जेऊर, शेलगाव वांगी, लव्हे,निंभोरे, घोटी ,वरकुटे, भाळवणी या गावातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आमदार संजयमामा शिंदे संपर्क कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा येथील सेवानिवृत्त नगरपालिका कर्मचारी मोहम्मद खान यांचे निधन

करमाळा प्रतिनिधी  करमाळा येथील सेवानिवृत्त नगरपालिका कर्मचारी हाजी मोहम्मद महेबूब खान पठाण उर्फ खान चाचा…

3 hours ago

*स्व.काकासाहेब थोबडे चषकाचे उपविजेते होत करमाळा वकील संघाने केली दमदार कामगिरी

करमाळा प्रतिनिधी- सोलापुर येथे चालु असलेल्या स्व. काकासाहेब थोबडे चषकामधे करमाळा वकील संघाने दमदार कामगिरी…

24 hours ago

प्राध्यापक डॉ. शरद जाधव यांना संगणकशास्त्राची पीएचडी पदवी

  करमाळा प्रतिनिधी  भालेवाडी (ता. करमाळा) येथील रहिवासी तथा महात्मा गांधी ज्युनिअर कॉलेज, करमाळा येथे…

1 day ago

जिल्हा दिव्यांग अधिकारी दक्षिण सोलापूरचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांची मुकबधीर शाळेला भेट दिव्यांग विद्यार्थ्यांसमवेत अधिकाऱ्यांचे जेवण

करमाळा प्रतिनिधी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी पदाचा नुकताच पदभार स्वीकारलेले दक्षिण सोलापूरचे गटविकास अधिकारी मनोज…

1 day ago

एन.सी.सी. हे देशसेवा व करिअर घडवण्याचे माध्यम’ -विलासरावजी घुमरे

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय मध्ये एनसीसी विभागातर्फे आर्मी, वायुसेना, पोलीस भरती इत्यादी…

2 days ago