Categories: करमाळा

विकासाची दृष्टी असलेले आमदार संजयमामा शिंदे यांना करमाळा तालुक्याच्या विकासासाठी येत्या 2024 ला पुन्हा एकदा निवडून द्यावे -मा.आ.जयवंतराव जगताप

करमाळा प्रतिनिधी विकासाची दृष्टी असलेले आमदार संजय मामा शिंदे यांना करमाळा तालुक्याच्या विकासासाठी येत्या 2024 ला पुन्हा एकदा निवडून द्यावी असे मत माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे अंतर्गत दहिगाव उपसा सिंचन योजनेवरील बंद नलिका वितरण प्रणालीची भूमिपूजन मंगळवार दिनांक 5 डिसेंबर रोजी साडे येथे झाले. यावेळी आमदार संजयमामा शिंदे जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड वाशिंबेचे सरपंच तानाजी बापू झोळ,  आदिनाथ कारखान्याचे माजी उपाध्यक्ष वामनराव बदे , उद्योजक भरतभाऊ आवताडे दशरथ घाडगे, या. सरपंच भोजराज सुरवसे, चंद्रहास निमगिरे, विलास दादा पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सागर दौंड मांगी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष सुजित बागल, घोटीचे सरपंच विलास राऊत अधीक्षक अभियंता धीरज साळी सोशल मीडिया प्रमुख राजेंद्र पवार, निंभोरेचे सरपंच रवींद्र वळेकर बिटरगाव श्री येथील सामाजिक कार्यकर्ते बबनराव मुरूमकर कार्यकारी अभियंता एटी जाधवर आदी जण उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना जयवंतराव जगताप म्हणाले की सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण उभारणीत स्वर्गीय नामदेव जगताप यांचे योगदान मोलाचे असून करमाळा तालुक्याच्या विकासासाठी उजनी धरण उभारण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या नंतर आपण स्वर्गीय दिगंबरराव बागल माजी आमदार शामल बागल माजी आमदार नारायण पाटील यांनी प्रयत्न केले. मात्र दहिगाव उपसा सिंचनचे काम राजकीय विरोधामुळे पूर्ण झाले नाही परंतु संजयमामा शिंदे यांच्या भगीरथ प्रयत्नामुळे हे काम पूर्णत्वास आले आहे.करमाळा तालुक्याच्या विकासासाठी आपण त्यांच्याबरोबर असून तुम्हीही आता करमाळा तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी संजय मामा यांना पुन्हा एकदा साथ द्या असे आव्हान त्यांनी केले. करमाळा तालुक्याचा सर्वांगीण विकासासाठी  आपण काम करत असून तालुक्याच्या विकासासाठी कुठल्याही प्रकारचा निधी कमी पडू न देता करमाळा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत राहणार असल्याचे आमदार संजय मामा शिंदे यांनी सांगितले .यावेळी कुकडी डावा कालवाचे उपकार्यकारी अभियंता एस के अवताडे यांनी प्रास्तविकात योजनेबाबत माहिती दिली देविदास ताकमोगे यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की स्वर्गीय दिगंबरराव बागल माजी आमदार जयवंतराव जगताप सांगोल्याचे गणपतराव देशमुख, माजी आमदार नारायण पाटील, तत्कालीन मंत्री रामराजे निंबाळकर आजच्या प्रयत्नांचा या योजनेमध्ये सहभाग असल्याची त्यांनी सांगितले. आमदार संजय मामा शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून विस्तारीकरण केले आहे. घोटीचे सरपंच विलास राऊत यांनीही या योजनेतील शेवटच्या गावाला बंद नळात पाणी मिळणार असल्याने सर्व भाग सुजलाम सुफलाम होणार असून आमच्यासाठी ही मोठी आनंदाची बाब आहे. यावेळी तानाजी मस्कर यांनीही मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय साखरे यांनी केले तर आभार  डॉ. विकास वीर यांनी मानले.

saptahikpawanputra

Recent Posts

जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान भक्त सेवा मंडळ करमाळा यांच्यावतीने 17 जानेवारी रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन

करमाळा प्रतिनिधी जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान भक्त सेवा मंडळ करमाळा यांच्या वतीने शुक्रवार दिनांक 17…

18 hours ago

नम्रता गुणवत्ता विद्ववत्ता याचा तिहेरी संगम म्हणजे मुख्याध्यापिका हेमा विद्वत सेवानिवृत्ती निमित्त संतोष काका कुलकर्णी यांचे गौरवोद्गार

करमाळा प्रतिनिधी नम्रता गुणवत्ता विद्ववत्ता याचा तिहेरी संगम म्हणजे मुख्याध्यापिका हेमा विद्वत मॅडम वरकुटे ता…

2 days ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट मध्ये माँ साहेब जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती विद्यार्थिनीच्या हस्ते उत्साहात साजरी*

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील प्रा निकत सरांचे ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट मध्ये 12 जानेवारी रोजी माँ…

2 days ago

राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेब यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करमाळा यांच्यावतीने साजरी

करमाळा प्रतिनिधी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या विचारांची खऱ्या अर्थाने समाजाला गरज । असून आदर्श राष्ट्र समाज…

3 days ago

राष्ट्रीय पातळीवरील साई गुणगौरव समाजभूषण पुरस्कार 2025 चे मानकरी श्री बाळासाहेब नरारे यांना पुरस्कार प्रदान

करमाळा प्रतिनिधी: ओम साई विकास प्रतिष्ठान व बीबीसी फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिला…

3 days ago