Categories: करमाळा

भाजपाचे सुपर वॉरिअर्स म्हणजे पक्षाचे भावी नेतृत्व :- मा.आ.प्रशांत परिचारक

करमाळा प्रतिनिधी :- भाजपाचे सुपर वॉरिअर्स म्हणजे पक्षाचे भावी नेतृत्व असलेचे मत भाजपाचे माढा लोकसभा प्रभारी माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी व्यक्त केले आहे. भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा करमाळा विधानसभा निवडणूक प्रमुख गणेश चिवटे यांनी करमाळा येथे आयोजित केलेल्या सुपर वॉरिअर्स बैठकीत ते बोलत होते.यावेळी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.आधिक बोलताना श्री परिचारक म्हणाले की,भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजपचे सर्व आमदार, खासदार, जि. प. सदस्य, प. स. सदस्य याशिवाय माझ्यासह सर्व नेते आज सुपर वॉरिअर्स म्हणून काम करत आहेत.त्यामुळे आजचे हे सर्व वॉरिअर्स म्हणजे पक्षाचे भावी नेते आहेत.आताच राजस्थान, छत्तीसगड व मध्यप्रदेश मध्ये भाजपने घवघवीत यश संपादान केले आहे यामध्ये बूथ कमीट्या व त्यामार्फत केलेलं नियोजन यांचा सिंहाचा वाटा आहे.यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत म्हणाले की,वॉरिअर्स यांनी पक्षाच्या सूचनेनुसार गावागावात सूक्ष्म नियोजन करावे.राज्य व केंद्र सरकारने अनेक लोकोपयोगी कल्याणकारी योजना सुरु केल्या आहेत, या योजनाचा लाभ तालुक्या-तालुक्यात हजारो लोकांना होत आहे.या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न करावेत.अडचणीत असणाऱ्या लोकांना मदत करावी.
यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा करमाळा विधानसभा निवडणूक प्रमुख,डि.पी.डी सी सदस्य गणेश चिवटे म्हणाले की,करमाळा माढा विधानसभा क्षेत्रातील सुपर वॉरिअर्स, बूथ समित्या व इतर कमीट्या आपण सशक्त करत असून याद्वारे आपण सर्व निवडणुकीत भाजपची ताकत पक्षाच्या आदेशाप्रमाणे वाढवणार आहोत. यावेळी या कार्यक्रमाला करमाळा तालुक्यातील सर्व सुपर वॉरियर्स व भाजपचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय घोरपडे यांनी केले तर आभार सोशल मीडिया संयोजक नितीन झिंजाडे यांनी केले.

FacebookFacebookTwitterTwitterWhatsAppWhatsAppShareShare
AddThis Website Tools
saptahikpawanputra

Recent Posts

दत्तकला कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये महाराष्ट्र खेळ दिवस साजरा

भिगवण प्रतिनिधी: दत्तकला कॉलेज ऑफ फार्मसी, स्वामी चिंचोली तालुका दौंड जिल्हा पुणे येथील औषधनिर्माण शास्त्र…

3 days ago

सोगाव (उंदरगाव )मधील निकत परिवारातील दोन सख्खे भाव एकाच वेळी एमबीबीएस डॉक्टर पदवी परीक्षा उत्तीर्ण

करमाळा प्रतिनिधी उंदरगाव तसेच पूर्व सोगाव मध्ये रहिवासी असलेल्या निकत परिवारातील श्री लक्ष्मण शिवदास निकत…

3 days ago

डिजिटल मिडिया संघटनेचे तिसरे महाअधिवेशन कोकणात होणार सावंतवाडीतील सुसज्ज “भोसले नॉलेज सिटी” हे संमेलन स्थळ-राजा माने

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह नारायण राणे, चंद्रकांतदादा पाटीलांसह राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रण-राजा माने* मुंबई,दि.:- डिजिटल मिडिया…

4 days ago

करमाळा तालुक्याच्या विकास कामांसाठी व प्रगतीसाठी मी सदैव तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

करमाळा प्रतिनिधी- करमाळा तालुक्याच्या विकास कामांसाठी व प्रगतीसाठी मी सदैव तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा असून…

5 days ago