उजनी धरणग्रस्त संघर्ष समिती ने करमाळा तालुक्यातील उजनी धरणग्रस्त व इतर लाभार्थी यानी शुक्रवार दिनांक 8 डिसेंबर रोजी निवेदन दिले.
यावेळेस बोलताना संघर्ष समिती चे अध्यक्ष प्रा.शिवाजीराव बंडगर यानी सांगितले की ,आम्ही उजनी धरणाससाठी आमची गाव ,घरेदारे,जमीन जुमला ,यांचा त्याग केला आहे . असे असताना आमचे हक्काचे पाणी आम्हाला मिळत नाही. आमच्या हक्काचे 12 टी एम सी पाणी आम्हाला सुरळीत पणे मिळायला पाहिजे.
या वर्षी पाऊस कमी झाला . धरण कमी म्हणजे केवळ 66 % भरले. सव्वा दिड महिन्यात याच पाण्यातील पाणी वारेमाप सोडले गेले. त्यामुळे आज केवळ 25 % पाणी शिल्लक आहे. उरलेल्या सहा सात महिन्यांत आणखीन वाईट परिस्थिती होईल .
पुढील संकटाची चाहुल लागल्याने धरणग्रस्तांनी आज उजनी च्या वरील धरणातून 10 टी एम सी पाणी सोडण्याची प्रमुख मागणी केली .
याचबरोबर सोलापूर शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी काम सुरू असलेली समांतर जलवाहिनी तात्काळ सुरू करावी , कालवा सल्लागार समितीने उजनी धरणग्रस्तांचे हक्काचे पाणी राखून ठेवून काटेकोर नियोजन करावे ,कालवा सल्लागार समितीत तालुक्यातील मूळ धरणग्रस्तांचे दोन प्रतिनिधी घ्यावेत. या मागण्या जलसंपदा मंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केल्या.
या वेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रा.शिवाजीराव बंडगर यांच्या सह उपाध्यक्ष भारत साळुंके,आदिनाथ चे माजी अध्यक्ष धनंजय डोंगरे ,माजी उपाध्यक्ष केरु गव्हाणे , माजी उपाध्यक्ष चंद्रकांत सरडे ,संचालक धुळाभाऊ कोकरे,माजी संचालक राजाभाऊ धांडे,बापूराव देशमुख, मकाई कारखान्याचे संचालक सचिन पिसाळ, माजी संचालक नंदकुमार भोसले, अजित रणदिवे ,करमाळा बाजार समितीचे माजी संचालक संतोष वारे,देवा ढेरे, बापूराव रणशिंग, पश्चिम भाग युवा नेते डाॅक्टर गोरख गुळवे ,वांगीचे युवा नेते ग्रामपंचायत सदस्य दत्त्ता बापू देशमुख, राजकुमार आदिनाथ देशमुख, केळी उत्पादक संघाचे सोलापूर जिल्हा सचिव अर्जुन तकीक,नैसर्गीक शेती चै संदीप यादव ,देशमुख, बिभीषण देशमुख, वांगीचे माजी सरपंच संजय कदम ,सामाजिक कार्यकर्ते विष्णू वाघमारे ,ढोकरीचे सरपंच देवा पाटील, माजी सरपंच महादेव वाघमोडे,सामाजिक कार्यकर्ते देवीदास माधव पाटील, बाबासाहेब चौगुले,वांगी 4 भिवरवाडीचे सरपंच सविता सूळ ,उपसरपंच,डॉक्टर भाऊसाहेब शेळके , वांगी 3 चे सरपंच मयुर रोकडे ,सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ, रोकडे , सौर ऊर्जेवरील बोट चे मालक श्रीहरी जाधव ,मांजरगावचे हनुमंत हुंबे,अंकुश चव्हाण, विजय प्रताप युवा मंच चे तालुकाध्यक्ष शिवशंकर माने,लखपती चंद्रकांत सरडे ,राजकुमार सरडे शेतकरी संघटना ,पांगरेचे माजी सरपंच चंद्रकांत पारेकर, ग्रामपंचायत सदस्य भैरवनाथ हराळे, महेश टेकाळे, वांगीचे सामाजिक कार्यकर्ते भारत रोकडे,देवा तळेकर , रामेश्वर पारेकर ,सौदागर दौंड, प्रमोद गोडगे,आदि उपस्थित होते.
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…