Categories: करमाळा

मकाईचे साखर कारखान्याचे शेतकऱ्याची थकलेली ऊस बिल मिळण्यासाठी प्राध्यापक रामदास झोळसर यांच्या नेतृत्वाखाली थू थू आंदोलन

करमाळा प्रतिनिधी मकाई सहकारी साखर कारखान्याची ऊस बिल तात्काळ मिळावे याकरिता प्रा. रामदास झोळ सर यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवार दिनांक 8 डिसेंबर रोजी करमाळा तहसील कार्यालयावर मकाई सहकारी साखर कारखाना तत्कालीन चेअरमन दिग्विजय बागल यांचा निषेध व्यक्त करत प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारुन थुंकुन थु थु आंदोलन करण्यात आले. टाळ मृदंगाच्या साथीने देवाच्या नावाचा नाद करत गांधीगिरी मार्गाने आंदोलन सुरू आहे. आपल्या गुराढोरासह शेतकऱ्यांनी ऊस बिल मागणीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मकाई सहकारी साखर कारखान्याची ऊस बिल जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहणार असल्याची प्राध्यापक रामदास झोळसर यांनी सांगितले आहे. गेल्या वर्षभरापासून मकाई सहकारी साखर कारखान्याकडे शेतकरी सभासदाची गेल्या वर्षीचे ऊस बिल बाकी असून गेल्या वर्षी उत्पादित साखर माॕलीसिस बॅगस साखरेचे पैसे कुठे गेले असा सवाल मकाई सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांनी करत संबंधित कारखान्याच्या चेअरमन व संचालक मंडळावर गुन्हे दाखल करून त्यांच्या मालमत्तेवर बोजा चढवण्यात यावा अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे. तालुका प्रशासनाने याबाबत जिल्हाधिकारी प्रशासनाला याबाबत गांभीर्याने दखल घेण्यासाठी सुचना करून मकाई कारखाना प्रशासनाला याबाबत विचारणा करून कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शब्द दिला असता तर आम्हाला आंदोलन करावे लागले नसते. याबाबत प्रशासन उदासीन भूमिका असल्यामुळे न्याय मिळणे कठीण झाले आहे याबाबत आपण जिल्हा प्रशासनाच्या भेटीला जाऊन याबाबत गांभीर्याने दखल घेण्यासाठी भाग पडणार आहोत याची दखल घेऊन संबंधित चेअरमन संचालक मंडळ यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांच्या मालमत्तेवर भोजना चढवल्यास करमाळा तहसील कार्यालयासमोर बेमुदत मकाई सहकारी साखर कारखान्याची बिल जोपर्यंत खात्यावर जमा होत नाही तोपर्यंत आंदोलन करणार असल्याचे प्राध्यापक रामदास झोळसर यांनी सांगितले .यावेळी कामगार नेते दशरथ आण्णा कांबळे, ॲड राहुल सावंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रवींद्र गोडगे , अंजनडोह माजी उपसरपंच शहाजी माने, शेतकरी संघटनेचे सुदर्शन शेळके, हरीभाऊ झिंजाडे,विठ्ठलराव शिंदे.प्रा.राजेश गायकवाड,मा.सरपंच भगवान डोंबाळे, हरिदास मोरे ,दिपक शिंदे शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते शेतकरी मोठया संख्येंने उपस्थित होते.यावेळी दशरथ आण्णा कांबळे म्हणाले की शेतकरी कामगार यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही आंदोलनात सहभागी झालो असुन शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण कार्यरत राहणार असून शेतकरी सभासद व कामगारांनी याबाबत मनामध्ये कुठलीही भीती न बाळगता आमच्या या लढ्यात सहभागी होईल आपल्या केसालाही धक्का लागणार नाही व आपल्या उसाचे पूर्ण पेमेंट 15 टक्के व्याजासह मिळून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी ॲड राहुल सावंत म्हणाले की शेतकरी प्रश्नाविषयी आम्ही या लढाईत सहभागी झालो असुन मकाई सहकारी साखर कारखान्याच्या सर्व संचालकावर गुन्हे दाखल करून त्यांच्या मालमत्तेवर बोजा चढून प्रसंगी त्यांची खाजगी मालमत्ता विकून शेतकऱ्याची बिले तात्काळ देण्यात यावी. जोपर्यंत शेतकऱ्यांना ऊस बिल मिळत नाही तोपर्यंत बेमुदत आंदोलन करून बिल मिळवून देण्यासाठी लढा तीव्र करणार असल्याचे त्यांनी सांगितले मकाईचे थकीत ऊस बिल मिळत नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या मुलांचे लग्न ,दवाखाना, शिक्षण संसाराचा गाडा चालवण्यासाठी अनेकांनी खाजगी सावकाराकडून कर्ज घेतले असल्यामुळे या शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ आली असून अशा शेतकऱ्यांचा संयमाचा बांध तुटल्यामुळे कारखान्याचे ऊस बिल आंदोलन पेटले असून आता खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचा संयमाचा बांध तुटला असून मकाई सहकारी साखर कारखान्या विषयी प्रचंड राग सभासदांमध्ये व्यक्त होत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे . त्यामुळे याबाबत प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी साखर आयुक्त यांनी योग्य ती कारवाई करून मकाई सहकारी साखर कारखान्याची ऊस बिल तात्काळ मिळण्या कामी संबंधितावर कारवाई करून शेतकऱ्यांना बिल तात्काळ खात्यावर जमा करण्याची मागणी प्राध्यापक रामदास झोळसर यांनी केली आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळ्यात रविवारी २९ डिसेंबरला होणार भव्य ग्लोबल टॅलेंट सर्च परीक्षा २०२४-२५

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…

1 day ago

२७ डिसेंबर रोजी करमाळ्यात कमलाई कृषी प्रदर्शन… निर्यातक्षम केळी व डाळिंब या विषयावरती परीसंवादाचे आयोजन… शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे पाणी फाउंडेशनचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…

3 days ago

आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था करमाळा आयोजित जाधव -पाटील हॉस्पिटलमध्ये 6 व्या मुळव्याधसंबंधी शिबिराची यशस्वी सांगता

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…

3 days ago

पंढरपूर येथे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्यावतीने उद्योजक संतोष काका कुलकर्णी यांचा सहकुटुंब सत्कार

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील‌ उद्योजक क्लासिक कंपनीचे ‌ मालक ‌ अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…

3 days ago

निमगाव (ह )येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर अल्पदरात चष्म्याचे वाटप

करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…

4 days ago