करमाळा प्रतिनिधी विकास प्रिय आमदार संजयमामा शिंदे यांनी जेऊर शेटफळ चिखलठाण कुगाव या 16 किलोमीटरच्या रस्त्यासाठी भरघोस निधी देऊन रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावला असल्याचे मत संजयमामा शिंदे गटाचे नेते माजी जिल्हा परिषद सदस्य आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत काका सरडे यांनी सांगितले. जेऊर ते चिखलठाण रस्ता होण्यासाठी वारंवार आपण आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत होतो. सुरुवातीच्या काळामध्ये सन 2020-21 साली दोन कोटी पन्नास लाख रुपये निधी आमदार संजयमामा शिंदे यांनी दिला. यानंतर 2022- 23 साली यंदा पावसाळी अधिवेशनात चार कोटी निधी दिला असून यंदाच्या हिवाळी अधिवेशनाच्या अर्थसंकल्पामध्ये चार कोटी 90 लाख रुपयांची तरतूद या रस्ते विकासाच्या कामासाठी करण्यात आली असून एकूण दहा कोटी 40लाख रुपयाचा निधी रस्त्याच्या विकासासाठी दिला आहे.यामुळे चिखलठाणच्या रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागला आहे . करमाळा तालुक्याचे विकास प्रिय आमदार संजय मामा शिंदे यांनी जेऊर चिखलठाण शेटफळ कुगाव या रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावल्यामुळे येथील शेतकरी ग्रामस्थ यांनी आमदार संजयमामा शिंदे यांचे अभिनंदन केले आहे. संजयमामा समर्थक चंद्रकांत काका सरडे यांनीही विकासाचे कास धरून आमदार संजय मामा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आपल्या पंचक्रोशीतील विकास कामाचा धडाका सुरू ठेवल्याने हा प्रश्न मार्गी लागला आहे .