करमाळा प्रतिनिधी मकाई सहकारी साखर कारखान्याचे शेतकऱ्यांचे थकीत ऊस बिल मिळण्यासाठी प्राध्यापक रामदास झोळसर यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आंदोलनाचा लढा चालू असून आठ डिसेंबर रोजी तहसील कार्यालयासमोर मकाई चेअरमन व संचालक मंडळ प्रशासन यांच्या विरोधात थु थु आंदोलन करण्यात आले. ऊस बिल कसल्याही परिस्थितीत मिळाले पाहिजे याकरिता आरपारची लढाई म्हणून आपल्या गुराढोर बैल कोंबड्या यांच्यासह शेतकऱ्यांनी करमाळा तहसीलसमोर भजन करून टाळ मृदंग वाजवत गांधीगिरी मार्गाने हे आंदोलन केले.करमाळा तालुका प्रशासनाकडून याची कुठलीही दखल न घेतल्याने झोळसर यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याशी संपर्क साधून या आंदोलनाची माहिती दिली.शुक्रवारी दुपारी चार वाजता करमाळा येथून प्राध्यापक रामदास झोळसर सर त्यांचे शेतकरी शिष्टमंडळ सोलापूर येथे भेटीसाठी गेले असता जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आपण मकाई साखर कारखान्याच्या शेतकरी ऊस बिलाबाबत गांभीर्याने दखल घेतली घेतली असून तत्कालीन चेअरमन कार्यकारी संचालक यांनाही तशा सूचना दिल्या असून त्यांनी येत्या 25 डिसेंबर पर्यंत आम्हाला दिले देण्यासाठी वेळ देण्याची मागणी केली या अनुषंगाने आपण येत्या ११ डिसेंबर रोजी तत्कालीन चेअरमन दिग्विजय बागल कार्यकारी संचालक हरिचंद्र खाटमोडे यांना भेटण्यास बोलले असून 25 डिसेंबर पर्यंत कसल्याही परिस्थितीत करण्याची सूचना त्यांना देणार असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले. त्यामुळे आपण शेतकरी थकीत ऊस बिल बाबत चालू असलेले आंदोलन स्थगित करावे .२५ डिसेंबर पर्यंत आपल्याला बिल न दिल्यास मी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकरी आंदोलन मागणीबाबत असलेल्या आंदोलकांच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आली. यावेळी प्राध्यापक रामदास झोळसर कामगार नेते दशरथ कांबळे , ॲड राहुल सावंत शेतकरी संघटनेचे रवींद्र गोडगे शेतकरी बांधव उपस्थित होते.