आदिनाथ कारखान्याला गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी सक्षम संचालक मंडळ बिनविरोध निवडून देऊन निवडणूक हाच सक्षम पर्याय असल्याचे मत माजी कार्यकारी संचालक हरीदास डांगे यांनी व्यक्त केले . आदिनाथ सहकारी साखर कारखाना प्रशासक यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या वीस पंचवीस दिवसापासून सुरू झाला असून फक्त चार हजार टन इतके गाळप झाले आहे.आदिनाथ कारखान्याची परिस्थिती बघता आदिनाथ कारखाना चालू करण्यासाठी सक्षम अशा नेतृत्वाची व संचालक मंडळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या सल्लागारपदी मागील आठवड्यात पाच जणांची निवड करण्यात आली या सल्लागार पदी निवड झाल्याबद्दल आदिनाथ कारखाना कर्मचारी प्रशासन कामगार व प्रशासक यांच्या विचार विनिमय बैठक घेण्यात आली. या बैठकीला प्रशासकीय संचालक संजय गुटाळ हे हजर होते तर बाळासाहेब बेंद्रे महेश चिवटे हे बैठकीला गैरहजर होते. या बैठकीस कार्यकारी संचालक अरुण बागनवर सल्लागार पदी निवड झालेले अच्युत तळेकर डॉक्टर वसंतराव पुंडे सुहास गलांडे धुळाभाऊ कोकरे वामन नवले, चेअरमन सोनवणे उपस्थित होते याचबरोबर माजी संचालक बापुराव देशमुख गोरख जगदाळे, हरीभाऊ मंगवडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रवींद्र गोडगे, अमोल घुमरे ,महादेव चौधरी ,संभाजी ब्रिगेडचे नितीन खटके पाटील यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना हरीदास डांगे म्हणाले की आदिनाथ कारखाना गतवैभव मिळून देण्यासाठी आपणास सल्लागार पदी निवड केली याबद्दल आपण मनापासून आभारी आहोत पण सध्याचा विचार करता कारखाना सुरू करण्याच्या वेळी आम्हाला याची कल्पना देऊन त्यावेळी आम्ही नक्कीच कारखान्याच्या गाळप्याच्या दृष्टिकोनातून सुयोग्य नियोजन केले असते परंतु आता ती वेळ निघून गेली आहे काना चालू असून हाती अल्प झालेली गाळप यामुळे कारखान्याचे होणारे नुकसान मशिनरीचे होणारे तूट, ऊस वाहतुकीची बाबतीत वाहनांची अपुरी यंत्रणा ,कामगारांच्या पगारी त्याचा विचार करता कारखाना बंद ठेवणे व पुन्हा निवडणुकीला सामोरे जाणे एवढेच आपल्या सध्या हातात आहे .त्यामुळे आदिनाथ कारखाना चालवण्याच्या बाबतीत आता पण खोटे आश्वासन देणार नाही त्यामुळे प्रशासन कामगार सभासद यांनी एक विचार करून आदिनाथ सहकारी साखर कारखाना पुन्हा एकदा उभारी घेण्याच्या दृष्टिकोनातून निवडणूक हाच पर्याय असून ही निवडणूक सर्व गटाच्या लोकांनी एकत्र येऊन बिनविरोध करावी व कारखान्याला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करावे त्यासाठी आपण पाहिजे ते सहकार्य करण्यास तयार असल्याची हरीदास डांगे यांनी सांगितले. यावेळी प्रशासकीय संचालक संजय गुटाळ यांनी आजिनाथ कारखाना चालू करण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न केले असून नामदार तानाजीराव सावंत नामदार नारायण राणे साहेब यांच्या माध्यमातून कारखान्याला सहकार्य करण्याची भूमिका पार पडली आहे परंतु सल्लागार मंडळ कामगार कर्मचारी यांचा विचार करता कारखान्याचे हिताच्या दृष्टिकोनातून कारखान्याला तोटा होत असेल तर कामगार कर्मचारी शेतकरी सभासद यांची बैठक घेऊन कारखाना बंद ठेवण्याबाबत निर्णय घेऊन आमची कारखान्याच्या उज्वल भविष्यासाठी निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी असल्याची संजय गुटाळ यांनी सांगितले. या कारखान्याच्या बैठकीमध्ये सल्लागार पदी निवड झालेल्या डॉक्टर वसंत पुंडे अच्युत तळेकर डांगे साहेब यांनी सल्लागार म्हणून काम करण्यास आपली तयारी नसल्याचे सांगितले. पण आदिनाथ कारखान्याला गतवैभव मिळवून देण्यासाठी निवडणूक हाच पर्याय असल्याचे मत व्यक्त केले असून आपण आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला चांगले दिवस आणण्यासाठी भविष्यात काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.