Categories: करमाळा

जातेगाव ते टेंभुर्णी या महामार्गाचे चौपदरीकरण होणार टेंडर प्रक्रिया सुरू -आमदार संजयमामा शिंदे


करमाळा प्रतिनिधी
करमाळा मतदारसंघाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा विषय असलेल्या जातेगाव ते टेंभुर्णी या 60.12 किलोमीटर लांब असलेल्या रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम होणार असून हे काम BOT तत्त्वावर होणार आहे. या प्रकल्पासाठी 935.66 कोटी खर्च अपेक्षित आहे. या महामार्गाच्या टेंडर प्रक्रिया संदर्भात श्री. एन.एल. यवतकर महाव्यवस्थापक भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या सहीने 11 डिसेंबर रोजी अधिसूचना प्रसिद्ध झाली असल्याची माहिती आमदार संजय मामा शिंदे यांनी दिली.
याविषयी अधिक माहिती देताना आमदार संजयमामा शिंदे म्हणाले की, करमाळा तालुक्याच्या दृष्टीने हा अतिशय महत्त्वाचा व संवेदनशील विषय होता. या महामार्गावरती आत्तापर्यंत वेगवेगळ्या अपघातामध्ये जवळपास 200 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला असून 300 पेक्षा अधिक लोक जखमी झालेले आहेत. हा रस्ता महाराष्ट्र शासनाकडे होता तो रस्ता भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कडे हस्तांतरित होण्यासाठी आपण शासन दरबारी विशेष प्रयत्न केले होते. त्यानुसार हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कडे हस्तांतरित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ना हरकत दाखल दिला.
हा रस्ता प्राधिकरण कडे हस्तांतरित झाल्यामुळे या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीचे काम हे आता महामार्ग प्राधिकरण कडून केले जाणार आहे ही करमाळा तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वाची बाब आहे .ऑनलाईन पोर्टलवरून 11 डिसेंबर पासून या कामाचे टेंडर भरता येणार आहेत त्याची अंतिम तारीख 29 जानेवारी 2024 आहे .टेंडर भारतीय प्रमाणवेळेनुसार 30 जानेवारी 2024 रोजी 11.30 वाजता उघडले जाईल .या रस्त्यामुळे करमाळा तालुक्याचा नगर व सोलापूर या जिल्ह्यांशी जोडण्याचा मार्ग सुकर होणार आहे तसेच मध्य रेल्वे व राष्ट्रीय महामार्गालाही करमाळा जोडले जाणार आहे. या रस्त्याचे काम मंजूर करण्यास महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे सहकार्य लाभले त्याचबरोबर केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी साहेब यांचे सहकार्य मिळाल्याची माहिती आमदार शिंदे यांनी दिली.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

17 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

20 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

22 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago