Categories: करमाळा

मांगी तलाव संदर्भात खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची दिल्लीत बैठक -१५ जानेवारीपर्यंत तलाव कुकडी प्रकल्पात विलीन होणार : गणेश चिवटे

करमाळा प्रतिनिधी : खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या अविरत प्रयत्नामुळे १५ जानेवारीपर्यंत मांगी तलाव कुकडी प्रकल्पात विलीन होणार असलेची अधिकृत माहिती भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य गणेश चिवटे यांनी दिली आहे.याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की,मांगी तलावसंदर्भात खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची काल दिल्लीत याबाबत बैठक पार पडली आहे.मांगी तलाव कुकडी प्रकल्पात कायमस्वरूपी वर्ग करण्याची मागणी या भागातील नागरिक गेली ५० वर्ष करीत होते.परंतु या मागणीला यश येत नव्हते परंतु माढा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी विलिनी करणासंदर्भात गत जून- २०२३ मध्ये मागणी केली होती. खासदारांनी यामध्ये लक्ष घालून संपूर्ण कुकडी प्रकल्पाचे फेरजलनियोजन करण्याचे नियोजन केले.यासाठी राज्य सरकारकडून निधी उपलब्ध करून घेतला.केंद्र सरकारच्या वेबकॉस या संस्थेमार्फत अवघ्या ६ महिन्यात फेरजलनियोजन अहवाल बनवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे.याबाबत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची काल वेबकॉस संस्थेचे CEO शंभु आझाद यांच्यासोबत दिल्ली येथे महत्वपूर्ण बैठक पार पडली आहे.या संस्थेचा अहवाल १५ जानेवारीपर्यंत तयार होऊन मांगी तलाव कुकडी प्रकल्पात अधिकृतरित्या कायमस्वरूपी विलीन होणार आहे.मांगी तलाव कुकडी प्रकल्पात विलीन झाल्यानंतर या तलावावर अवलंबून असलेल्या २५-३०गावांतील शेती व पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे.करमाळा,जामखेड,कर्जत,परांडा या भागातील बाजार समिती व सर्व साखर कारखाने,दुग्ध व्यवसाय यासह सर्वच छोट्या- मोठ्या व्यावसायांना सोन्याचे दिवस येणार आहेत.करमाळा शहर व परिसरातील लोकांमध्ये मोठी भरभराट होणार आहे असे चिवटे यांनी शेवटी सांगितले.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

16 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

19 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

21 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago