Categories: करमाळा

आदिनाथ साखर कारखान्याला वाचवायचे असेल तर सर्वसामान्य सभासंदाचे मुलांना संचालक बनवा तेच कारखाना वाचवतील.-ॲड अजित विघ्ने


करमाळा प्रतिनिधी आदिनाथ सह. साखर कारखान्यावर सध्या प्रशासक असुन, तालुक्यातील महेश चिवटे व संजय गुटाळ हे तज्ञ संचालक म्हणुन आहेत, त्यातच आणखी पाच लोकांना सल्लागार म्हणुन नेमण्यात आले होते परंतु त्यापैकी सुहास गलांडे आणि धुळाभाऊ कोकरे यांना वगळता अच्युत पाटील, डॉ. पुंडे आणि हरिदास डांगे साहेब या तिघांनी सल्लागार पद नाकारले आहे. याबाबत पश्चिम भागातील युवक नेते आणि राजकीय विश्लेषक, अभ्यासक असणारे ॲड. अजित विघ्ने यांना याबाबत प्रतिक्रिया विचारली असता, त्यांनी आदिनाथ साखर कारखाना खरचं वाचविण्याची गरज असेल तर सर्वसामान्य शेतकर्यांच्या मुलांना आता संचालकत्व द्यावे लागेल तरच कारखाना वाचेल असे स्पष्ट केले तसेच जुन्या संचालक, चेअरमन यांनी आता याबाबत अजिबात लक्ष घालु नये. तालुक्यातील सर्व प्रमुख राजकीय नेत्यांनी आदिनाथ पासुन अलिप्त राहुनच सर्वसामान्याच्या होतकरू तरुणांना संधी देऊन संचालक म्हणुन पाठवले पाहीजे. आदिनाथ हे शेतकऱ्यांचे मंदीर आहे असे म्हणणाऱ्या पासुन तर आता खुपच भीती वाटायला लागली आहे. मंदीराचे पुजारी होऊन कारखान्याची वाट लावणारांना जनता धडा शिकविणार आहेच. वस्तुतः मधल्या काळात हा कारखाना भाडे तत्वावर बारामती ॲॅग्रो ला दिला असता तर नक्कीच आज चांगले दिवस बघायला मिळाले असते परंतु त्यावेळी गलिच्छ राजकारण झाले असुन, ही संस्था मातीत घालणारांनी या संस्थेच्या हिताचा थोडा तरी विचार करून जुन्या सर्व संचालक व माजी चेअरमन ,व्हा.चेअरमन यांनी नव्यांना संधी द्यावी. आजपर्यत या संस्थेत सर्वांनाच संधी दिली परंतु सब घोडे बारा टक्के ही म्हण खरी ठरत कोणीच संस्थेला गर्तेतुन बाहेर काढले नाही. त्यामुळे आता सर्वसामान्य शेतकरी व ऊस उत्पादकांची तरुण मुलेच संधी दिल्यास हा कारखाना वाचवतील. असे स्पष्ट मत त्यांनी मांडले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा पिसे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा सुरेश पिसे (वय ७१) यांचे अल्पशा…

11 hours ago

लोकशाही बचाव अराजकता हटाव सोलापूरच्या भाजप मोर्चाच्या नियोजनासाठी भाजप जिल्हा युवा नेते दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत करमाळ्यात १ नोव्हेंबरला बैठक- सचिन पिसाळ

करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…

5 days ago

दुष्काळ व पाणीटंचाई संदर्भातील बैठक आमदार.नारायण (आबा)पाटील यांनी जेऊर येथे न घेता करमाळा येथे पंचायत समिती सभागृहात घ्यावी- ॲड. अजिनाथ विघ्ने उपसभापती पं.स.करमाळा

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…

1 week ago

डॉ अजिंक्य पवार यांची एम.डी. परीक्षेत यशस्वी भरारी; जनरल मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन डॉ. रविकिरण पवार कुटुंबीयांचा अभिमान उंचावला सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…

1 week ago

प्रा. डॉ. महेश निकत यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान; करमाळ्याच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव

  करमाळा, प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा यांचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. महेश मच्छिंद्र…

1 week ago