Categories: करमाळा

करमाळा एस टी आगारासाठी तातडीने ३० नवीन बसेसची व्यवस्था करावी : माजी आमदार जयवंतराव जगताप यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

करमाळा प्रतिनिधी करमाळा एसटी आगारासाठी तातडीने ३० नवीन बसेस उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे याविषयी अधिक माहिती देताना जगताप यांनी सांगीतले कि ,करमाळा एसटी आगाराकडे बसेसची संख्या कमी असून आहेत त्यादेखील नादुरूस्तीचे प्रमाण जास्त आहे . सुस्थितीतील एसटी बसेसची संख्या कमी असल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत . करमाळा आगाराला लांब व जवळच्या पल्ल्यासाठी एकूण ८५ बसेसची आवश्यकता असताना ६५ बसेस उपलब्ध आहेत त्यातील १० नादुरुस्त आहेत ,त्यामुळे गाड्या फेल होणे – रद्द होणे असे प्रकार वारंवार घडत आहेत . त्यामुळे पासेस काढलेले शालेय विद्यार्थी , रुग्ण व प्रवाशांना प्रचंड गैरसाईला सामोरे जावे लागत आहे .शासनाने महिलांना व ज्येष्ठांना सवलतीच्या दरात प्रवास सुविधा दिल्या मुळे एसटी कडे प्रवाशांचा ओढा मोठ्या प्रमाणात वाढला आहे . परंतु बसेसची संख्या व त्यातही सुस्थितीतील बसेसची संख्या अपुरी आहे . तरी यांवर ठोस उपाययोजना व अत्यावश्यक सेवेतील भाग असल्यामुळे शासनाने करमाळा बस आगारा साठी तातडीने ३० नवीन बसेस उपलब्ध कराव्यात अशी मागणी माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे . “करमाळ्याचे दिवगत माजी आमदार नामदेवराव जगताप यांनी राज्य परिवहन महामंडळाचे सदस्य असताना करमाळा येथे भव्य बसस्थानक व वर्कशॉप ची उभारणी केली होती तसेच शेकडो तरुणांना एसटी महामंडळात रोजागाराची संधी दिली होती .कै . जगताप यांची महामंडळ सदस्यपदाची कारकिर्द अविस्मरणीय होती .त्यामुळे माजी आमदार जगताप यांच्या मागणीला विशेष महत्व आहे .

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

19 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

22 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

23 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago