Categories: करमाळा

करमाळा तालुक्यात तलाठी व सर्कल कार्यालय बांधकामासाठी 4 कोटी 20 लाख निधी मंजूर


करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यासाठी अतिशय महत्त्वाचा विषय असलेल्या महसूल विभागातील मंडळ अधिकारी व तलाठी कार्यालय बांधकामासाठी आमदार संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नातून डिसेंबर 2023 च्या पुरवणी अर्थसंकल्पामध्ये 4 कोटी 20 लाख निधी मंजूर झाला आहे .यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शहरांमध्ये हेलपाटे घालण्याची आता आवश्यकता राहणार नाही.
प्रत्येक ग्रामपंचायतीला ग्रामपंचायत कार्यालय असते परंतु तलाठी कार्यालय तालुक्यांमध्ये जवळपास नाहीतच .जी आहेत ती मोडकळीला आलेली आहेत किंवा ग्रामपंचायतीच्या आश्रयाने उभी आहेत ही अडचण लक्षात घेऊन आमदार संजयमामा शिंदे यांनी तलाठी व सर्कल कार्यालय बांधकामासाठी प्रत्येकी 15 लाख रुपये याप्रमाणे 28 बांधकामासाठी 4 कोटी 20 लाख निधी मंजूर केला आहे.

*या गावात होणार मंडळ अधिकारी कार्यालय* –
करमाळा, जेऊर, केम ,सालसे, अर्जुननगर ,कोर्टी, केतुर व उमरड .

*या गावात होणार तलाठी कार्यालय* – देवळाली, जातेगाव, वांगी, निंभोरे, गुळसडी ,कंदर ,घोटी, पांगरे, आवाटी साडे कोळगाव करंजे रावगाव वीट जिंती हिंगणी कात्रज , चिखलठाण ,वाशिंबे व शेटफळ.

चौकट – दुर्लक्षित विषयांकडे आ. संजयमामा शिंदे यांचे बारीक लक्ष
रस्ते,पाणी, वीज या समस्यांबरोबरच दुर्लक्षित असलेल्या विषयांकडे आमदार संजयमामा शिंदे यांनी बारीक लक्ष दिले असून करमाळा तालुक्यात गेल्या 4 वर्षात नवीन बांधकामासाठी जवळपास 100 कोटी पेक्षा अधिक निधी त्यांनी आणलेला आहे. यामध्ये डिकसळ पूल – 55 कोटी, नगरपरिषद नवीन इमारत , सांस्कृतिक भवन व छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा करणे बांधकाम -10 कोटी, उपजिल्हा रुग्णालय करमाळा श्रेणीवर्धन करून 100 खाट रूपांतर -25 कोटी, उपजिल्हा रुग्णालय करमाळा अधिकारी व कर्मचारी वसाहतीसाठी – 18 कोटी, सहाय्यक निबंधक कार्यालय बांधकामासाठी -1 कोटी 69 लाख, ग्रामपंचायत कार्यालय बांधकामासाठी -4 कोटी.

saptahikpawanputra

Recent Posts

राज्य फेंसिंगच्या रणांगणात कुचन प्रशालेचे तीन शिलेदार! ३४ व्या ज्युनियर राज्य फेंसिंग अजिंक्यपद स्पर्धेत अक्षय पिट्टा, श्वेता विडप व गंधम तुलसी यांचा सहभाग

करमाळा प्रतिनिधी: अमरावती येथे सुरू असलेल्या ३४ व्या ज्युनियर राज्य फेंसिंग अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्ये…

3 hours ago

करमाळा तालुक्यात शेतीपंपांची वीज कपात म्हणजे शेतकऱ्यांना आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा प्रकार शंभूराजे जयवंतराव जगताप यांचा इशारा ​

​करमाळा प्रतिनिधी: गेल्या दोन-तीन वर्षांपासून शेतकरी वर्ग सातत्याने अस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना करत आहे.…

6 hours ago

बैलपोळ्यानिमित्त गोसेवेचा जागर; ९० गोमातांच्या सान्निध्यात भक्तिमय सोहळा गुरु गणेश दिव्यरत्न गो-पालन संस्थेत पुरणपोळीचा नैवेद्य, विधिवत गोपूजन अन् गोसेवेचा संदेश

करमाळा प्रतिनिधी बैलपोळा हा केवळ बैलांच्या पूजनाचा सण नसून, कृषीसंस्कृती, पशुप्रेम, कृतज्ञता आणि भारतीय परंपरेतील…

1 day ago

करमाळ्यात ‘ज्ञान माऊली’ सांस्कृतिक उपक्रम उत्साहात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या विचारांचा जागर; बाल वारकऱ्यांपासून दिग्गजांचा सन्मान

  करमाळा प्रतिनिधी : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्माचे ७५० वे वर्ष राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरे…

2 days ago