Categories: करमाळा

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या निधीतून करमाळा तालुक्यासाठी 1.90 कोटी रुपये निधी मंजूर – गणेश चिवटे

करमाळा प्रतिनिधी- खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या निधीतून करमाळा तालुक्यासाठी 1.90 कोटी रुपये निधी मंजूर झाला असलेची माहिती भाजपाचे जि.सरचिटणीस तथा सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य गणेश चिवटे यांनी दिली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की,माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी राज्य सरकारच्या 25-15 व 12-38
या योजनेअंतर्गत करमाळा तालुक्यासाठी 1 कोटी 90 लाख रुपयांची विकास कामे मंजूर केली आहेत यामध्ये आवाटी,कंदर, केम,चिखलठाण ,जिंती,तरटगाव ,
पोमलवाडी,भालेवाडी ,वांगी-3,वांगी -4, करंजे,झरे ,बिटरगाव श्री,मोरवड,मिरगव्हाण या गावांमधील लोक उपयोगी विकास कामांसाठी हा निधी मंजूर केला आहे.मंजूर कामे पुढीलप्रमाणे आवाटी येडेश्वरी मंदिर सभामंडप १० लाख रु.,कंदर पवार घर ते विठ्ठल मंदिर मार्गे संजय थोरे घर रस्ता सुधारणा १० लाख रु.,केम हनुमान मंदिरसमोर सांभामंडप १० लाख रु, केम भैरवनाथ मंदिर सभामंडप १० लाख रु,चिखलठाण सुभाष सुराणा घर ते संजय उंबरे रस्ता काँक्रीटिकरण १० लाख रु.,चिखलठाण अर्जुन टिंगरे घर ते जि. प. शाळा रस्ता सिमेंटिकरण १०लाख रु.,जिंती जिंती ते पोमलवाडी रस्ता डांबारीकरण १० लाख रु.,जिंती गाव ते रेल्वे स्टेशन रस्ता काँक्रीटिकरण १० रु.,तरडगाव सभामंडप १० लाख रु.,पोमलवाडी वाचनालय सभागृह १० लाख रु.,भालेवाडी भालेवाडी ते जुने गावठाण रस्ता दुरुस्ती १० लाख रु.,वांगी नंबर ३ गणपतराव सातव दुकान ते गुरुलिंग पांडेकर घर रस्ता दुरुस्ती १० लाख रु.,वांगी नंबर ४ चांद तांबोळी घर ते विष्णू ढवळे घर रस्ता १० लाख रु,रांझनी ओंकारनाथ देवस्थान पेवर ब्लॉक १० लाख,करंजे व्यायाम शाळा बांधणे ५ लाख,झरे अमृळे वस्ती ते बागल वस्ती रस्ता ५लाख,झरे चौधरी वस्ती हातपंप ते चंद्रकांत चौध रस्ता काँक्रीटिकरण१० लाख,बिटरगाव श्री जुना करमाळा रस्ता सुधारणे १० लाख,मोरवड व्यायामशाळा बांधणे १० लाख,मिरगव्हाण स्मशानभूमी सुशोभीकरण १० लाख,मिरगव्हाण जुने गावठाण ते शिरसाठ महाराज रस्ता १० लाख रु. आदी लोकोपयोगी विकास कामे मंजूर केल्याबद्दल करमाळा तालुक्यातील सर्व स्तरातील जनतेमधून त्यांचे आभार मानले जात आहे, या पुढील नजिकच्या काळात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे आणखी विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देणार आहेत. करमाळा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी ते नेहमी प्रयत्न करत असल्याचेही चिवटे यांनी शेवटी सांगितले.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

15 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

19 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

20 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago