दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ सेवा केंद्र करमाळा यांच्यावतीने दत्तजयंती निम्मित अखंड नामजप सामुदायिक गुरुचरित्र पारायण

करमाळा प्रतिनिधी श्री स्वामी समर्थ महाराज व अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरूपीठ त्र्यंबकेश्वर चे पिठाधीश परमपुज्य श्री गुरूमाऊली यांच्या कृपा आशीर्वादाने व आदरणीय युवासंत चंद्रकांत दादासाहेब यांच्या परवानगीने श्री दत्त जयंती अखंड जप नाम यज्ञ सप्ताह श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र केमिस्ट भवन गणेश नगर करमाळा येथे दि.20/12/2023ते 2712/2023 पर्यंत आयोजित करण्यात आला आहे.या सप्ताह मध्ये सामुदायिक गुरूचरित्र पारायण,प्रहर सेवा, गणेश याग, चंडी यांग, रुद्र याग, मल्हारी सप्तशती पठण, दुर्गा सप्तशती पठण, यांसारख्या विविध ग्रंथ पठण सेवा अखंड पुणे सुरू राहणार आहेत. प्रहर सेवेमध्ये दोन सेवेकरी स्वामी चरित्र सारामृत पठण, दोन सेवेकरी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप, दोन सेवेकरी विना वादन करून श्री स्वामी समर्थ मंत्र जप सेवा अखंड पणे करणार आहेत.आज पासून या सप्ताहास सुरूवात झाली आहे.करमाळा शहरातील पहिल्याच सामुदायिक श्री गुरुचरीत्र पारायणास आज सुरूवात झाली असून एकूण 56 सेवेकरी यांनी सहभाग घेतला आहे.प्रहर सेवा देखील सुरू झाली आहे.तरी जास्तीत जास्त लोकांनी या सेवेमध्ये सहभाग घेऊन अतिउच्च कोटींची सेवा श्री स्वामी समर्थ महाराज व परमपुज्य श्री गुरूमाऊली यांच्या चरणी रुजू करावी. आपली कोणतीही समस्या सोडविण्याचे सामर्थ्य या दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ सेवा मार्गात असून आपल्या समस्येवरील अध्यात्मिक मार्गदर्शन साठी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र गणेश नगर करमाळा येथे संपर्क साधावा असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र गणेश नगर यांच्या मार्फत करण्यात आले आहे. खूप कमी कालावधीत करमाळा परिसरात श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र सुरू झाली असून हजारो सेवेकरी श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाला जोडले गेले आहेत. समस्या अनुरूप मार्गदर्शन घेऊन समस्या सूटल्याचे अनुभव हजारो सेवेकरी घेत आहेत.

saptahikpawanputra

Recent Posts

नगरसेविका सुवर्णा आल्हाट, रोहिदास आल्हाट यांच्या पाठपुराव्याला यश नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा प्रभागातील नागरिकांकडून कौतुक

करमाळा : प्रतिनिधी करमाळा शहरातील साठेनगर परिसरात नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा…

2 hours ago

मुख्याधिकाऱ्यांच्या पत्रानंतर निदर्शन आंदोलन स्थगित- वैभवराजे जगताप.

करमाळा - प्रतिनिधी शहरातील पाणीपुरवठा, रस्ते व स्वच्छता यासह इतर समस्या सोडवण्यासाठी गुरुवार दिनांक ८/१०/२०२६…

2 days ago

भाजपा सोलापूर ग्रामीण पश्चिमची करमाळा येथे ‘विकसित भारत संकल्प सभा’ उत्साहात संपन्न पदयात्रेला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,

  करमाळा प्रतिनिधी :- देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी सोलापूर…

3 days ago

करमाळा बाजार समितीमध्ये आमदार राजाभाऊ राऊत यांचा सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी बार्शी विधानसभा मतदारसंघाचे विधान परिषदेचे आमदार राजाभाऊ राऊत यांचा करमाळा येथील…

3 days ago

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

6 days ago