Categories: करमाळा

करमाळा माढा तालुक्याच्या पोलीस पाटील पदाची निवड प्रक्रिया पारदर्शी व्हावी —-श्री देविदास आप्पा साळुंके

करमाळा प्रतिनिधी 
करमाळा व माढा तालुक्यातील पोलीस पाटील पदाची निवड प्रक्रिया चालू आहे त्या सदर्भात कोंढार चिंचोली सरपंच देविदास साळुंके यांनी मा जिल्हाधिकारी सोलापूर यांना निवेदन देऊन ही निवड प्रक्रिया पारदर्शी करणे कामी योग्य मागणी केली आहे त्याचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांनी परीक्षेविषयी सांगताना आधी सर्व उमेदवारांचे गुण प्रसिद्ध करून त्यात सर्वात जास्त गुणांच्या उमेदवाराचा विचार करून त्याची पोलीस पाटील पदासाठी विचार व्हावा व सर्व पात्र उमेदवारची मुलाखती घेताना व्हिडीओ शूटिंग घ्यावे म्हणजे निवड प्रक्रिया पारदर्शी होईल, प्रांतधिकारी कुर्डुवाडी यांनी काढलेल्या दि 14/9/2023 च्या जाहीनाम्यात अट क्र 19 मध्ये पात्र उमेदवारची फक्त यादी प्रसिद्ध करण्यात येईल व गुण प्रसिद्ध केले जाणार नाहीत याचा अर्थ काय होतो असेही श्री साळुंके यांनी म्हटले आहे यात दोन्ही तालुक्यातील लोकप्रतिनिधि यांनी त्वरित लक्ष देण्याची गरज आहे असे साळुंके यांनी प्रश्न उपस्थित करून निवड प्रक्रिया ही पारदर्शी व्हावी अशी मागणी महसूल प्रशासन कडे लेखी केली आहे अशी निवड करणे कामी वरिष्ठानी त्वरित लेखी आदेश निवड समितीचे अध्यक्ष मा प्रांतधिकारी व निवड समिती सदस्य मा तहसीलदार करमाळा, माढा देणेत यावेत अशी लेखी पत्राने दि 23/12/2023च्या पत्राने साळुंके यांनी केली असुन त्या पत्रांच्या कॉपीज सर्व अधिकारी यांना पाढविल्या आहेत तेव्हा या मागणीचे सर्वत्र कौतुक होत आहे. तेव्हा प्रशासन काय करते ते पाहणे गरजेचे आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

3 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

4 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

5 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

5 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

6 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

6 days ago