Categories: Uncategorized

करमाळा चेस असोसिएशन व यशकल्याणी सेवाभावी संस्था आयोजित सोलापूर डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशन बुद्धिबळ स्पर्धेमध्येशंकर साळुंखे, प्रसन्न जगदाळे, सानवी गोरे विजेते

करमाळा प्रतिनिधी 

करमाळा चेस असोसिएशन व यशकल्याणी सेवाभावी संस्था आयोजित सोलापूर डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशन यांच्या मान्यतेने रविवारी संपन्न झालेल्या भव्य खुल्या एकदिवस बुद्धिबळ स्पर्धेत
अत्यंत अटीतटीच्या लढतीत खुल्या गटात शंकर साळुंखे याने उत्कृष्ट खेळ करत प्रथम क्रमांकासह रोख रक्कम ₹ ३००० व चषक पटकाविला तसेच १५ वर्षाखालील गटात प्रसन्न जगदाळे व ११ वर्षाखालील गटात सानवी गोरे यांनी जेतेपद पटकाविले. प्रसन्नला रोख रक्कम १००० व ट्रॉफी तर सानवीला रोख रक्कम ७०० व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.

स्पर्धेचे उद्दघाटन करमाळा येथील यश कल्याणी सेवाभावी संस्थाचे अध्यक्ष मा. गणेश (भाऊ) करे – पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे मेडिकल असोसिएशनचे मा. सचिन साखरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक संघटनेचे जिल्हाअध्यक्ष मुकुंद साळुंखे सर यांनी केले.

सदर स्पर्धेत सोलापूर, नगर, पुणे जिल्ह्यामधून एकूण ८४ खेळाडूंनी सहभाग नोंदविला. यश कल्याणी सेवा संस्थाचे अध्यक्ष गणेश (भाऊ) करे पाटील यांनी प्रथमच सर्व सहभागी खेळाडूंना मेडल व प्रमाणपत्र घोषित करून एक नवीन परंपरा सुरू केली. करमाळा तालुक्यातून बुद्धिबळ खेळणाऱ्या लहान खेळाडूंना एक प्रकारचे प्रोत्साहन देण्याचे काम यश कल्याणी सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून केले. या स्पर्धेत ११ आंतरराष्ट्रीय मानांकित खेळाडूंनी सहभाग नोंदवला सदर स्पर्धेत प्रमुख पंच गणेश मस्कले (स्टेट आरबिटर ) सहाय्यक पंच शंभु मेरूकर, पंगुडवाले विजय, सुभाष उपासे होते.

*स्पर्धेचा निकाल* पुढील प्रमाणे दूसरा क्रमांक कोरे प्रज्वल रोख रक्कम 2000 व ट्रॉफी , तिसरा क्रमांक नितीन अग्रवाल रोख रक्क्म 1000 व मेडल , चौथा क्रमांक पंगुडवाले विजय रोख रक्कम 700 व मेडल ,पाचवा क्रमांक मुचिंडकर श्रीकांत रोख रक्कम 500व मेडल सहावा क्रमांक रिद्धी उपासे मेडल ,सातवा वा क्रमांक मारणे रेणुका मेडल,8 वा क्रमांक कुरुंद संतोष मेडल,9 वा क्रमांक राठोड निखिल मेडल,10 वा क्रमांक वाडीशेरला नवीना मेडल,वयोगट 15 मध्ये प्रथम क्रमांक जगदाळे प्रसन्न रोख रक्कम 1000 व ट्रॉफी, दुसरा क्रमांक शिंदे मेघराज रोख रक्कम 700 व ट्रॉफी , तिसरा क्रमांक भिंगारे आदित्य रोख रक्क्म 500 व मेडल , चौथा क्रमांक कांबळे संस्कार रोख रक्कम 300 व मेडल ,पाचवा क्रमांक विश्वजीत जाधव रोख रक्कम 200 व मेडल सहावा क्रमांक भास्कर भार्गव मेडल ,सातवा वा क्रमांक आगरकर वेद मेडल,8 वा क्रमांक सरडे तन्वीर मेडल,9 वा क्रमांक सूर्यवंशी श्रेया मेडल,10 वा क्रमांक जमादार पवन
वयोगट 11 गटात प्रथम सान्वी गोरे रोख रक्कम 700 व ट्रॉफी, दुसरा क्रमांक राठोड ऋषिकेश रोख रक्कम 500 व ट्रॉफी , तिसरा क्रमांक पाटील भारगव रोख रक्क्म 300 व मेडल , चौथा क्रमांक कोठारी सिद्धांत रोख रक्कम 200 व मेडल ,पाचवा क्रमांक उलभगत अनन्या मेडल सहावा क्रमांक मेंडक रघुवेद मेडल ,सातवा वा क्रमांक अर्कल विवान मेडल,8 वा क्रमांक पाथरूडकर शाश्वत मेडल,9 वा क्रमांक पांडेकर वेदांत मेडल,10 वा क्रमांक खंडागळे ज्योती मेडल
*करमाळा शहर व तालुक्यासाठी बक्षीसे* पुढील प्रमाणे
ओपन गट राठोड अमोल रोख रक्कम 700 व ट्रॉफी, दुसरा क्रमांक परदेशी बलराम रोख रक्कम 500 व मेडल , तिसरा क्रमांक दोशी संम्मेद मेडल , चौथा क्रमांक ओंकार देशमुख मेडल ,पाचवा क्रमांक कृष्णा मेरूकर रोख मेडल सहावा क्रमांक सीतापुरे प्रथम मेडल ,सातवा वा क्रमांक पंडित युवराज मेडल
*वयोगट 15* मध्ये अथर्व राठोड रोख रक्कम 500 व ट्रॉफी, दुसरा क्रमांक नामदे प्रतीक रोख रक्कम 500 व ट्रॉफी , तिसरा क्रमांक सार्थक गांधी मेडल , चौथा क्रमांक गुगळे ऋषभ मेडल ,पाचवा क्रमांक पठाडे राजवीर मेडल, सहावा क्रमांक अथर्व बरीदे मेडल ,सातवा वा क्रमांक संम्मेद कोकीळ मेडल,
*वयोगट 11* मध्ये प्रथम क्रमांक अंश राठोड रोख रक्कम 500 व ट्रॉफी, दुसरा क्रमांक सिद्धी देशमुख रोख 300 व मेडल , तिसरा क्रमांक देवराज कन्हेरे मेडल , चौथा क्रमांक जाधव श्वतांजली मेडल पाचवा क्रमांक अक्षित क्षीरसागर मेडल,6 वा क्रमांक लावंड प्रबंजन मेडल
दिव्यांग खेळाडू मध्ये पहिला क्रमांक संदीप गव्हाणे, दूसरा क्रमांक वडीशेरला भारत,तिसरा क्रमांक प्रतीक नामदेव यांनी पटकाविला.

करमाळा चेस असोसिएशनचे ट्रस्टी सदस्य मा. श्री प्रा.नागेश माने, मुकुंद साळुंखे सर,विजय डाळवाले,सचिन दळवे,शंभु मेरूकर,अमोल राठोड व असोसिएशन चे अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी स्पर्धा यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

3 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

4 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

5 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

5 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

6 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

6 days ago