Categories: करमाळा

कुस्तीमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल माजी आमदार नारायण आबा पाटील यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान

करमाळा प्रतिनिधी कुस्तीमध्ये दिलेल्या योगदनाबद्दल माजी आमदार नारायण पाटील यांना निमगाव (केतकी) ता. इंदापूर येथील ग्रामस्थांकडून जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला.
जीवन गौरव पुरस्कार सुवर्णयुग गणेश मंदिर ट्रस्ट विश्वस्तांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी मल्ल सम्राट रावसाहेब मगर,  महाराष्ट्र केसरी छोटा रावसाहेब मगर, , रवींद्र माळवदकर,पैलवान उत्तम दादा फरतडे, प्रशांत भागवत, शरद झोळ सर, प्रवीण ठवरे,सुभाष झोळ,
,मच्छिंद्र आप्पा चांदणे, भगवान काका घाडगे, दशरथ आप्पा बनकर,सूर्यकांत महामुनी, वसंत बापू घाडगे,भारत दादा मोरे यांचेसह सुवर्णयुग गणेश मंदिर ट्रस्ट तसेच सुवर्ण योगेश्वर पतसंस्था आणि निमगाव केतकी ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. निमगाव (केतकी) येथील कुस्तीच्या आखाड्यात हा भव्य सोहळा पार पडला. माजी आमदार नारायण पाटील यांनी सन १९८५ ते सन १९८८ या सलग चार वर्षात ७४ किलो वजन गटात महाराष्ट्रात प्रथम येण्याचा विक्रम केला होता. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या या चार अधिवेशनात त्यांनी सलग चार सुवर्ण पदके जिंकली होती. तसेच ७४ किलो वजन गटात ग्रीको रोमन या कुस्ती मधील प्रकारामध्ये त्यांनी राष्ट्रीय सुवर्ण पदक मिळविले होते व देशात प्रथम येण्याची कामगिरी करून दाखवली होती. निमगाव (केतकी) येथील कुस्ती आखाड्यात त्यांनी एक काळ आपल्या कुस्तीमुळे हजारो कुस्ती रसिकांना सर्वोच्च खेळाचे प्रदर्शन करून मंत्रमुग्ध केले होते. या परिसरातील कुस्ती रसिकांचे नारायण पाटील हे आवडते पैलवान आहेत. यामुळेच निमगाव (केतकी) ग्रामस्थांनी माजी आमदार नारायण पाटील यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करून सन्मानित केले.माजी आमदार नारायण पाटील यांनी कुस्ती रसिकांचे आभार व्यक्त केले. आपल्या भावना व्यक्त करताना त्यांनी कुस्तीसाठी आपण सतत योगदान देत राहणार असून पूर्वी एक पैलवान म्हणून प्रत्यक्ष मैदानात खेळ करत योगदान दिले तर आता लोकप्रतिनिधी म्हणून कुस्ती क्षेत्रातील समस्या सोडवून या क्रीडा प्रकाराला आणि कुस्तीगीर यांना राजमान्यता, सन्मान व गतवैभव मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे बोलून दाखवले. यावेळी त्यांचे समवेत महाराष्ट्र केसरी बालारफी शेख तसेच पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर तसेच पैलवान नारायण पाटील कला क्रीडा मंडळाचे कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

लोकशाही बचाव अराजकता हटाव सोलापूरच्या भाजप मोर्चाच्या नियोजनासाठी भाजप जिल्हा युवा नेते दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत करमाळ्यात १ नोव्हेंबरला बैठक- सचिन पिसाळ

करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…

4 days ago

दुष्काळ व पाणीटंचाई संदर्भातील बैठक आमदार.नारायण (आबा)पाटील यांनी जेऊर येथे न घेता करमाळा येथे पंचायत समिती सभागृहात घ्यावी- ॲड. अजिनाथ विघ्ने उपसभापती पं.स.करमाळा

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…

7 days ago

डॉ अजिंक्य पवार यांची एम.डी. परीक्षेत यशस्वी भरारी; जनरल मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन डॉ. रविकिरण पवार कुटुंबीयांचा अभिमान उंचावला सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…

1 week ago

प्रा. डॉ. महेश निकत यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान; करमाळ्याच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव

  करमाळा, प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा यांचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. महेश मच्छिंद्र…

1 week ago

अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळा येथील नरेंद्रसिंह ठाकुर यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळा येथील नरेंद्रसिंह ठाकुर यांची…

1 week ago