करमाळा प्रतिनिधी सध्या सर्वत्र युरिया टंचाई सुरू असून याला केवळ रासायनिक खत विक्रेत्यांना त्यांना जबाबदार धरले जात आहे ही दुर्दैवाची गोष्ट असून कृषी विभागाने जिल्ह्यासाठी येणारा युरिया स्वतःच्या ताब्यात घेऊन कृषी विभागाच्या मार्फत वाटप करावे व युरिया वाटप प्रक्रियेतून कृषी विक्रेत्यांना बाजूला करावे अशी मागणी महाराष्ट्र फर्टिलायझर्स पेस्टिसाइड्स सीड्स डीलर असोसिएशनचे संचालक महेश चिवटे यांनी केली आहे याबाबत बोलताना चिवटे म्हणाले की खत विक्रेत्यांना कंपनीकडून युरिया अत्यंत कमी प्रमाणात दिला जातो. युरिया सोबत इतर मिश्र खते व्यापाऱ्यांना पाठवली जातात शेतकरी केवळ युरिया घेऊन जातात इतर खते व्यापाऱ्यांकडे डंप होतात.टंचाईच्या काळात कंपन्या रेल्वे स्टेशन वरून खत देतात वाहतुकीसाठी व्यापाऱ्यांना मोठा खर्च येतो दुकानात दोनशे पोते खत आले तर पाचशे शेतकरी दारात असतात. काही शेतकरी गरज नसताना जास्तीचा युरिया खरेदी करून साठा करून ठेवतात. सध्या कोरोना चा संसर्ग वाढत असताना खत विक्रेते स्वतःचा जीव धोक्यात घालून शेतकऱ्यांना खत पुरवठा करत असतात अशा परिस्थितीत सुद्धा काही स्वयंघोषित समाजसेवक जाणीवपूर्वक खत विक्रेत्यांना त्रास देतात खत विक्रेत्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी कोणालाही वेळ नाही केवळ युरिया द्या अशी मागणी करून अनेक खत दुकानात वादावादीचे प्रसंग हाणामारी पर्यंत गेले आहेत या सर्व त्रासाला खत विक्रेते कंटाळले आहेत. कृषी विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना व्यापा-यांच्या अडचणी माहित आहे .युरियाची गाडी आल्या नंतर त्याची पोस्ट मशीनला नोंदणी झाल्यानंतरच युरियाची विक्री करता येते.यावेळी नेट मुळे ऑनलाइन बंद पडले तर नाईलाजाने गेट पासवर खते विकावी लागतात. व नंतर रात्री बिले करावी लागतात यामुळे कृषी विभागाने उपलब्ध होणारा युरिया ताब्यात घेऊन कृषी विभागामार्फत वाटप करावा रासायनिक खत कंपन्या खत विक्रेत्यांना इतर खते लिंक करतात मात्र पुढील काळात खत कंपन्यांकडून सहकार्य होणार नाही .या भीतीपोटी व्यापारी तक्रारी करत नाहीत या निवेदनावर महावीर शेठ सोळंकी लखन काळे राधेश्याम देवी प्रशांत नेटके रोहित दोशी संपतशेठ राठोड प्रदीप देवी संजय कटारिया कुमार दोशी पियुष गांधी राहुल लगदिवे प्रवीण कोठावळे अमोल कृषी पांडुरंग जाधव यांच्या सह्या आहेत.
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…
करमाळा प्रतिनिधी छोटे छोटे भूखंड उपलब्ध व्हावे या मागणीसाठी आपण विशेष प्रयत्न केले असून उद्योग…