Categories: करमाळा

झरे ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी मंजुश्री मुसळे बिनविरोध

करमाळा प्रतिनिधी : झरे ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी आमदार संजयमामा शिंदे व स्व विलासराव पाटील  गटाच्या  मंजुश्री मयूर मुसळेची यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या या निवडीबद्दल गावात गुलालाची उधळण करत फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला.झरे (तालुका करमाळा) ग्रामपंचायतच्या उपसरपंच मैना पोपट घाडगे यांनी राजीनामा दिलाने उपसरपंच पद रिक्त झाले होते. या ठिकाणी मंजुश्री मुसळे यांची उपसरपंच पदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. निवड प्रक्रियेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुनीता कांबळे तर सचिव म्हणून ग्राम विकास अधिकारी गणेश कळसाईत यांनी काम पाहिले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुनिता पाटील, भारत मोरे, बंडू घाडगे, मैना घाडगे, प्रशांत पाटील, बाळासाहेब गायकवाड उपस्थित होते. निवडीनंतर गावात फटाके फोडून पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी बबन घाडगे, बाळासाहेब घाडगे, भीमराव घाडगे, माजी उपसरपंच संतोष मुरूमकर, विजय माने, वस्ताद हनुमंत शिंदे, नारायण सुरवसे, माजी सरपंच बापू सरोदे, डॉक्टर शिवाजी काळे, किशोर पाटील, दादा पाटील, बाबासाहेब घाडगे, अनिल मिटे, पोपट घाडगे, संजय साबळे, दत्ता जाधव, दिलीप कांबळे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

नगरसेविका सुवर्णा आल्हाट, रोहिदास आल्हाट यांच्या पाठपुराव्याला यश नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा प्रभागातील नागरिकांकडून कौतुक

करमाळा : प्रतिनिधी करमाळा शहरातील साठेनगर परिसरात नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा…

48 mins ago

मुख्याधिकाऱ्यांच्या पत्रानंतर निदर्शन आंदोलन स्थगित- वैभवराजे जगताप.

करमाळा - प्रतिनिधी शहरातील पाणीपुरवठा, रस्ते व स्वच्छता यासह इतर समस्या सोडवण्यासाठी गुरुवार दिनांक ८/१०/२०२६…

2 days ago

भाजपा सोलापूर ग्रामीण पश्चिमची करमाळा येथे ‘विकसित भारत संकल्प सभा’ उत्साहात संपन्न पदयात्रेला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,

  करमाळा प्रतिनिधी :- देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी सोलापूर…

3 days ago

करमाळा बाजार समितीमध्ये आमदार राजाभाऊ राऊत यांचा सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी बार्शी विधानसभा मतदारसंघाचे विधान परिषदेचे आमदार राजाभाऊ राऊत यांचा करमाळा येथील…

3 days ago

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

6 days ago