Categories: करमाळा

मकाईचे थकीत ऊस बिल 3 जानेवारीपर्यंत न दिल्यास कठोर कारवाई करणार – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे प्रा.रामदास झोळ यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी बांधवांना आश्वासन

करमाळा प्रतिनिधी मकाई सहकारी साखर कारखान्याचे थकीत ऊस बिल 3 जानेवारीपर्यंत न दिल्यास मकाई सहकारी साखर कारखान्याचे तत्कालीन चेअरमन संचालक मंडळ यांच्यावर कारवाई करणार असल्याचे आश्वासन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले .मकाई सहकारी साखर कारखान्याचे सन 2022-23 थकीत ऊस बिल न मिळाल्यामुळे शेतकरी बांधवांनी प्राध्यापक रामदास झोळसर सर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट घेतली. यावेळी प्रा. रामदास झोळसर यांच्यासमवेत शेतकरी कामगार पक्षाचे दशरथ आण्णा कांबळे, ॲड राहुल सावंत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र गोडगे, प्राध्यापक राजेश गायकवाड, हरिदास मोरे, अंजनडोहचे माजी उपसरपंच शहाजी माने अजिनाथ चे माजी संचालक विठठल शिंदे माधव(दादा)नलवडे यांच्या समवेत शेतकऱ्याची थकीत ऊस बिल मिळण्यासाठी आम्ही वेळोवेळी कारखाना प्रशासन यांच्याकडे पाठपुरावा केला तरी सुद्धा आमची दखल कुणी घेतली नाही म्हणून आम्ही सुरुवातीला बोंबाबोंब आंदोलन आमरण उपोषण त्यानंतर थु थु आंदोलन केले तरी मकाई सहकारी साखर कारखान्याची चेअरमन कार्यकारी संचालक यांनी फक्त आम्हाला आश्वासन देत चालढकल करण्याची काम केले प्रशासनाने हा विषय गांभीर्याने घेणे गरजेचे होते संबंधित तहसीलदार तसेच सरकारी यंत्रणेनेही आमच्या मागणीची दखल घेऊन आम्हाला न्याय मिळवून देणे अपेक्षित होते परंतु तसे झाले नाही म्हणून आमच्यावर झालेल्या अन्यायाचा पाडा वाचण्यासाठी आम्ही आपणास भेटायला आले असून ऊस बिल न मिळाल्यामुळे आम्हाला आमच्या दैनंदिन गरजाही भागवणे कठीण बनणे आहे अनेकांनी सावकारी कर्ज काढले असून त्या सावकाराची कर्ज फेडण्यासाठी आम्हाला पैशाची अत्यंत गरज आहे अनेक मुला मुलींचे लग्न शिक्षण पैसे अभावी रखडले आहे अशा परिस्थितीत आम्हाला आता पैसे मिळाले नाही तर आत्मदहन करण्याशिवाय पर्याय नाही आपण एक जबाबदार अधिकारी आहात आमच्या भावना समजून घेऊन आम्हाला न्याय देतात या भावनेतून आम्ही आपणाकडे आलो आहोत तरी आपण आमच्या ऊस बिल मागणीची दखल घेऊन याबाबत काही सहकारी साखर कारखाना चेअरमन संचालक मंडळ कार्यकारी संचालक यांच्यावर कारवाई करून आम्हाला ऊस बिल मिळून देऊन न्याय मिळवून द्यावा अशी मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी करमाळा तालुक्यातून गेलेल्या शंभर ते दीडशे शेतकऱ्यांना आपल्या कार्यालयामध्ये प्रवेश करून घेऊन त्यांच्या भावना जाणून घेतल्या व यावर आपण गांभीर्याने दखल घेत असून मकाई सहकारी साखर कारखान्याच्या बाबत संबंधित संचालक मंडळ व प्रशासन यांची भूमिका आपल्याला लक्षात आली असून यावर आपण तीन तारखेला त्यांना मीटिंगसाठी बोलवले असून त्याआधी त्यांनी ऊस बिल देणे अपेक्षित आहे त्यांनी जर ऊस बिल न दिल्यास आपण मकाई सहकारी साखर कारखाना चेअरमन संचालक मंडळ कार्यकारी संचालक यांच्यावर कठोर कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा तालुक्यात महावितरणविरोधात संतापाचा भडका: जेऊर कार्यालयासमोर १८ सप्टेंबरला भव्य धरणे आंदोलन; शंभूराजे जगताप यांचे शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन

​करमाळा: प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…

17 mins ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

20 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

23 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

1 day ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago