करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्राध्यापक रामदास झोळसर यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी कामगार पक्षाचे नेते दशरथ आण्णा कांबळे , ॲड राहुल सावंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र गोडगे ,शहाजी माने यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद निवेदन दिले होते. प्राध्यापक रामदास झोळ सर यांच्या विविध प्रश्ना सोडवण्यासंबधी मागणीची दखल घेऊन अधिकारी शेतकरी यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालय येथै संप्पन झाली. या बैठकीमध्ये प्राध्यापक रामदास झोळसर यांनी सध्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागणार असल्याचे सांगितले. उजनी धरणाच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्याविषयी कालवा समितीच्या बैठकीत ते म्हणाले की उजनीतील पाण्याच्या साठ्याला हात न लावता जिल्ह्यातील धरणातून दहा टीएमसी पाणी घेऊन नंतर पाणी कालवाद्वारे सोडण्याचे नियोजन करण्याची गरज असल्याचे सांगितले. येत्या उन्हाळ्यामध्ये पाण्याची टंचाई प्रमाणात भासणार नाही पावसाळ्यापर्यंत पाण्याची योग्य नियोजन होईल त्यासाठी त्या पद्धतीने आपण अधिकाऱ्यांना तशा सूचना द्याव्यात असे नमुद केले . करमाळा तालुक्यात दळणवळणासाठी प्रवासाठी एसटी बस हाच पर्याय आहे.करमाळा आगारातुन चांगले उत्पन्नही मिळत असतानाही कुशल कामगार योग्य नियोजनाचा अभाव असल्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहे एसटी बस सारख्या नादुरुस्त होत असल्यामुळे त्या बसेस लवकरात लवकर दुरुस्त करण्यासाठी सोलापूर जिल्ह्याची तज्ञ लोकांची मेकॅनिक ची टीम करमाळ्याला पाठवून करमाळा आगारातील नादुरुस्त एसटी बसचा प्रश्न सोडवाण्याची मागणी त्यांनी जिल्हाधिकारीकडे केली असता यावर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन लवकरात लवकर एसटी नादुरुस्त बस दुरुस्त करण्याचे तसेच गरजेनुसार नवीन बस उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. दुष्काळी परिस्थितीमुळे मुला मुलींच्या शिक्षणाच्या फीबाबत शैक्षणिक संस्थाना तगादा न लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. एकंदर करमाळा तालुक्यातील विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्राध्यापक रामदास झोळसर यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद त्यांच्याकडे मागणी केलेल्या सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. करमाळा तालुक्यातील उजनी धरणाच्या पाणी नियोजनाचा प्रश्न एसटी नादुरुस्त बस दुरुस्ती व नवीन बस मागणीचा प्रश्न विद्यार्थी शैक्षणिक फि बाबतचा प्रश्न मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.