Categories: करमाळा

भारत हायस्कूल जेऊरच्या वार्षिक स्नेहसंमेलनात 9 जानेवारी रोजी श्रीमंत कोकाटे यांचे व्याख्यानाचे आयोजन

करमाळा प्रतिनिधी मंगळवारी जेऊर येथे श्रीमंत कोकाटे यांचे व्याख्यान असून  इतिहास प्रेमींना भारत शिक्षण प्रसारक मंडळ यांच्याकडून  मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सचिव प्रा अर्जुन सरक यांनी केले आहे. या एकूण कार्यक्रमाबद्दल माहिती देताना संस्था सचिव सरक यांनी सांगितले की जेऊर ता. करमाळा येथील भारत शिक्षण प्रसारक मंडळाच्या शैक्षणिक संकुलाचे वार्षिक स्नेहसंमेलन दिनांक ९ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता संपन्न होत आहे. या निमित्त प्रसिद्ध इतिहासकार आणि वक्ते श्रीमंत कोकाटे यांचे व्याख्यान भारत शैक्षणीक संकुलाच्या भव्य मैदानावर आयोजित केले आहे. संस्था अध्यक्ष तथा माजी आमदार नारायण (आबा) पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा संपूर्ण सोहळा पार पडणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रसिध्द उद्योगपती नारायण शेठ आमरुळे (झरे ) यांना आमंत्रित केले आहे. या कार्यक्रमात  दहावी, बारावी बोर्ड, विद्यापीठ आणि स्पर्धा परीक्षेत विशेष यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे तसेच तालुका, जिल्हा, विभागीय, राज्य, आणि राष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात निवड झालेल्या विद्यार्थी खेळाडूंचे सत्कार मान्यवरांचे हस्ते बक्षीस वितरण सोहळ्यात होणार आहेत.भारत शैक्षणिक संकुलाचे हे ६४ वे वार्षिक स्नेहसंमेलन असून मंगळवार ९ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता व्याख्यान तसेच गुणवंत विद्यार्थी पारितोषिक वितरण सोहळा होणार आहे. तर बुधवार १० जानेवारी रोजी दुपारी २ वाजता विविध गुण दर्शन कार्यक्रम होणार आहे. यंदा शिक्षक चिटणीस म्हणून पाटकुलकर सर यांचेवर जबादारी सोपवण्यात आली आहे. भारत शिक्षण प्रसारक मंडळाच्या प्राथमिक, हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज तसेच भारत महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी हे या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी परिश्रम व योगदान देत असल्याचे सचिव प्रा अर्जुनराव सरक यांनी सांगितले. यावेळी संस्था उपाध्यक्ष अनिलकुमार गादिया, महाविद्यालय प्राचार्य डॉ अनंतराव शिंगाडे,भारत हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज प्राचार्य केशव दहिभाते, उपप्राचार्य एन. डी कांबळे, पर्यवेक्षक बी एस शिंदे,भारत प्रायमरीचे मुख्याध्यापक दीपक व्यवहारे,शिक्षक  चिटणीस पाटकुलकर आदी उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

15 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

18 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

20 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago