करमाळा प्रतिनिधी समाजातील उपेक्षित वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपला वाढदिवस सामाजिक उपक्रमाद्वारे साजरा करा असे आवाहन ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटचे संचालक प्राध्यापक महेश निकत सर यांनी केले. समाजातील वंचित घटकांना फायदा होईल या भावनेतून त्यांनी वाढदिवस साजरा केला. जे का रंजले गांजले त्याची म्हणे जो आपुले तोचि साधू ओळखावा देव तेथेची जाणावा या उक्तीप्रमाणे ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटचे संचालक प्राध्यापक महेश निकत सर यांनी आपला वाढदिवस करमाळा तालुक्यातील ज्ञान प्रबोधनी मतिमंद विद्यालय कोर्टी येथेतुम्ही सपत्नीक मुलांच्या हस्ते केक कापून त्या मुलांना आपल्या आई च्या हस्ते खाऊचे वाटप करून साजरा केला. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून याची प्रचीतीच करून दिली आहे एकीकडे आजचा युवक आपल्या वाढदिवसानिमित्त विनाकारण फटाके बँड पार्टी यांच्यामध्ये पैशाची उधळण करून आपला वाढदिवस साजरा करतो परंतु प्राध्यापक महेश निकत सर यांनी यासोबत अनाथ मतिमंद मुलाच्या बरोबर वाढदिवस साजरा केला आहे. प्राध्यापक महेश निकत त्यांची धर्मपत्नी सौ .अश्विनी निकत व आई पुष्पा निकत यांचा सपत्नीक सत्कार ज्ञान प्रबोधनी मतिमंद विद्यालयाचे श्री बागडे व सर्व शिक्षक वृंदाचे वतीने करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त सतरा मतिमंद मुलांना गोड खाऊचे वाटप करण्यात आले असून या मुलांना लागणाऱ्या शैक्षणिक साहित्याचाही मदत करणार असल्याची त्यांनी सांगितले . समाजातील संपन्न वर्गातील लोकांनी आपला वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा केला तर खऱ्या अर्थाने समाजाचा सर्वांगीण विकास झाल्याशिवाय राहणार नाही यासाठी प्रत्येकाने ज्याची त्याची भूमिका घेणे गरजेचे आहे परमेश्वराने आपल्याला जे दिले आहे त्यातील काही भाग समाजातील वंचित घटकांना देऊन त्यांना विकासाच्या प्रवाहात आणले तर खऱ्या अर्थाने समाजात सुख शांती नांदणार आहे त्यामुळे प्रत्येकानी नुसते बोलण्यापेक्षा आपल्या कृतीतून समाजाचे ऋण मिळावी आपण खारीचा वाटा दिला तर समाजाचे खऱ्या अर्थाने कल्याण होईल असेही प्राध्यापक महेश निकत सर यांनी सांगितले.