करमाळा प्रतिनिधी आठरा पगड जाती या सर्व मराठा असुन आजचे मराठा हे कुणबीच आहेत.असे मत अभ्यासक व नेरले ग्रा.पं मा सरपंच औदुंबरराजे भोसले यांनी व्यक्त केले आहे. प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे माननीय औदुंबरराजे म्हणतात* 18 पगड जाती या जाती नसून ते 18 प्रकारचे काम आहे.सर्व सोयी सुविधा उपलब्ध होऊन जीवन सुखी होण्यासाठी मराठा जातीमध्ये नियोजनबद्ध कामाचे वाटप झाले.कोण काय काम करते यावरून त्या कुटुंबाची व्यक्तीची समूहाची ओळख तयार झाली व पुढे त्याचे रूपांतर जातीमध्ये झाले.उदाहरणार्थ लोखंडाचे काम करणारा लोहार झाला.जात_मराठा व्यवसाय_ लोहारकी,तेल बनविणारा तेली झाला.जात-मराठा व्यवसाय-तेली,. माठ,डेरा, मडके, कुंभ म्हणजे गोल हे चारही शब्द समानार्थी आहेत.याचे काम करणारा कुंभार झाला.जात- मराठा व्यवसाय -कुंभारकी.शेती, कुळ,कुणबाव हे तिन्ही शब्द समानार्थी आहेत.शेती म्हणजे कुणबावचे काम करणारा कुणबी झाला. *कुळ या शब्दावरून छत्रपती शिवरायांना देखील कुळवाडी भूषण म्हणजे शेतकरीभूषण असे म्हटले आहे.* जात- मराठा व्यवसाय- कुणबी ,कातडे,चमडे,चांभ तिन्ही शब्द समानार्थी आहेत.याचे काम करणारा चांभार झाला.जात- मराठा व्यवसाय-चांभारकी.शेळ्या मेंढ्यांना पूर्वी धनाचेआगर असे म्हटले जायचे आजही शेळीला गरीबाची काय असे म्हणतात. त्यामुळे या धनाच्या आगाराचे व्यवसाय करणारा धनगर झाला. जात-मराठा व्यवसाय-धनगर..राजेमल्हारराव होळकर यांना धनगर सरदार असे कधी म्हटले नसून मराठा सरदार राजेमल्हारराव होळकर अशीच नोंद इतिहासामध्ये आहे. अशाप्रकारे कोण काय काम करते यावरून त्या समूहाची व व्यक्तीची ओळख निर्माण झाली.मराठा कुणबी सोडून इतर व्यवसायिकांचा मराठा हा शब्द सोडून आपल्या कामाचाच उल्लेख जात म्हणून होत राहिला. किंवा काही विघ्न संतोषी लोकांनी मराठाचे विभाजन व्हावे या उद्देशाने मराठा जात पुसण्याचे काम केले त्यामुळे त्यांची मराठा ही ओळख कमी झाली.जगद्गुरु तुकाराम महाराजांनी देखील अभंगाद्वारे :: *तुका म्हणे एका देहाचे अवयव ;सुखदुःख जीव भोग पावे::* म्हणजे सर्व जाती या एकाच देहाच्या आहेत.एससी एसटी ओबीसी कोणताही फरक नाही.त्यामुळे सर्व व्यावसायिक जातीने आपली मराठा ओळख कायम ठेवावी व आजच्या कुणबी मराठा समाजाची काही लोकांच्या नोंदी कुणबी म्हणून तर काही लोकांच्या नोंदी मराठा म्हणून असल्या तरी आजचे सर्व मराठा शेतकरी म्हणजे कुणबीच आहेत.त्यामुळे कुणबी व्यवसायिकांना आरक्षण मिळण्यास कुठलीच अडचण नाही.हे पत्रक कोणाच्या भावना दुखावण्यासाठी नसुन वास्तववादी व सत्य इतिहास असल्याचे मत नेरले ता.करमाळा ग्रा.पं.मा.सरपंच व हिंदवी स्वराज्यग्रुपचे संस्थापक श्रीमंत-औदुंबरराजे भोसले यांनी व्यक्त केले आहे