संजय साखरे प्रतिनिधी
.29 जुलै रोजी दुपारी ठीक एक वाजता पुणे बोर्डने जाहीर केल्याप्रमाणे दहावीचा निकाल ऑनलाइन जाहीर झाला. यामध्ये श्री. राजेश्वर विद्यालय राजुरी ता. करमाळा जि. सोलापूर या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी उज्वल यशाची परंपरा याही वर्षी कायम राखली. विद्यालयाचा शंभर टक्के निकाल लागलेला आहे. सन 2019-2020 या शैक्षणिक वर्षांमध्ये पुणे बोर्डाच्या परीक्षेसाठी प्रशालेतील 48 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यापैकी वाशिंबे केंद्रात माऊली भागवत साखरे प्रथम व निकिता सुखदेव गायकवाडने द्वितीय क्रमांक पटकावला. विद्यालयातील 48 विद्यार्थ्यापैकी डिस्टिंक्शन मध्ये 19 विद्यार्थी, फर्स्ट क्लास मध्ये 23 विद्यार्थी व सेकंड क्लास मध्ये 06 विद्यार्थी उत्कृष्ट गुणाने यशस्वी झालेले आहेत. यापैकी पहिले टॉप फाईव्ह विद्यार्थी खालील प्रमाणे आहेत.
1) माऊली भागवत साखरे-93.00%
2) निकिता सुखदेव गायकवाड- 91.40%
3) मुस्कान नजिर मुलाणी- 90.40%
4) अविष्कार किसन बोबडे- 88.40%
5) अनुराधा माऊली चिंचकर- 87.20%
वैजनाथ स्वामी सेवा मंडळाचे सचिव श्री. लालासाहेब गोविंद जगताप व प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. अनिल सोपान झोळ शिक्षक वृंद धनंजय साखरे, मारुती साखरे, अमोल कोल्हे, विजय गरड, जगन्नाथ अवघडे, गंगाराम वाघमोडे, रत्नाकर तळेकर, सौ.महानंदा कांबळे, सौ. वैशाली कोल्हे आदींनी सर्व व यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वांनी कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…