करमाळा प्रतिनिधी विद्यार्थ्याना शालेय जीवनात मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासठी छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा जपुन आदर्श पिढी निर्माण करण्यासाठी दिवाळीनिमित्त प्रा. रामदास झोळ फाऊंडेशन यांच्या वतीने किल्ले बांधणी स्पर्धचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेला करमाळा तालुक्यातील विद्यार्थ्यांनी उदंड प्रतिसाद दिला. या किल्ले बांधणी स्पर्धेमध्ये केतुर ता. करमाळा येथील विनोद साठे यांनी प्रथम क्रमांक मिळवला. करमाळा येथे तालुका पत्रकार सन्मान सोहळ्याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार, आय बी एन लोकमतचे माजी कार्यकारी संपादक मंदार फणसे यांच्या हस्ते किल्ला बांधणी स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. प्रा. रामदास झोळ फाउंडेशन यांच्यावतीने घेण्यात आलेल्या ऑनलाईन स्पर्धेमध्ये करमाळा तालुक्यातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता प्रथम क्रमांकाचे 11 हजार रुपयांचे बक्षीस विनोद साठे केतुर, द्वितीय क्रमांकाचे नऊ हजाराचे बक्षीस शिवराज झिंजाडे पोथरे, महेश नाईकनवरे शेटफळ यांनी तृतीय क्रमांकाचे सात हजार रुपयाचे बक्षीस तर विराज नाईकनवरे यांनी पाच हजार रुपयांचे चतुर्थ उत्तेजनार्थ तनिष्का शिंदे विहान ननवरे प्रणिता अवघडे प्रिया अवघडे प्रसाद लोंढे कुंदन शर्मा नीरज सागडे अर्णव मिंड, कटारिया ग्रुप सहभागाबद्दल सत्यम शिंगटे आर्यन जाधव आरोही जाधव रुद्र स्वामी संचित गायकवाड साईराज गायकवाड सिद्धी राऊत शुभम गायकवाड साईराज फरतडे यांना बक्षीस देण्यात येऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी करमाळा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश चिवटे, दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक रामदास झोळ सर,सचिवा सौ. माया झोळ मॅडम, यांच्या उपस्थितीत दिमाखात बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला.करमाळा तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी घेण्यात आलेल्या किल्ला बांधणी स्पर्धचे प्राध्यापक रामदास झोळ सर फाउंडेशनच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.