सुरताल संगीत विद्यालय तालुका करमाळा च्या वतीने सुर सुधा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार संजय मामा शिंदे तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, यशकल्याणी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निवृत्त सहसंचालक दत्तात्रेय देवळे, डॉ अँड बाबुराव हिरडे आदी उपस्थित होते.
प्रथम मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी सुर ताल विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध गीते सादर केली. सूरताल संगीत विद्यालयाच्या वतीने आणि यश कल्याणी सेवाभावी संस्थेच्या वतीने यावेळी विविध पुरस्कार देण्यात आले. डॉक्टर कविता कांबळे यांना संगीत रसिक तसेच करमाळा पंचायत समिती चे गटशिक्षणाधिकारी राजकुमार पाटील यांना बा सं नरारे महाराज जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. तर कलाकारामध्ये सरबानी सेन कोलकता व चित्रलेखा गोगोई गुवाहाटी करमाळा नृत्यभूषण अवार्ड, डॉक्टर विधी नागर इंदोर व डॉक्टर मयुरा आनंद खटावकर यांना करमाळा नृत्यभूषण अवॉर्ड, स्नेहा रामचंद्र हैदराबाद व अर्पिता व्यंकटेश कोलकता यांना नृत्य शिरोमणी अवार्ड, काकली हजारिका गुवाहाटी व वनिता भांजा, भूबनेश्वर यांना नृत्य सम्राज्ञी अवार्ड तर दीपिका बोरो गुवाहाटी यांना करमाळा नृत्य कला अवार्ड देऊन गौरविण्यात आले.
यावेळी यश कल्याणी सेवाभावी संस्थेच्या वतीने सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब नरारे यांना सुर सुधा जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पत्रकार दिनानिमित्त करमाळा तालुक्यातील पत्रकारांचा सुरताल विद्यालयाच्या वतीने सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाची सांगता राग भैरवी गाऊन करण्यात आला. यावेळी प्रा मिलींद फंड, संतोष पोतदार, लक्ष्मण लष्कर, दिगंबर पवार, डॉ महेश वीर, महादेव फंड, सुहास कांबळे, सारंग ढवळे, अशोक बरडे, गणेश आरडे, किरण नरारे, किशोरकुमार नरारे,शंभू आलापुरे, निलेश कुलकर्णी, निशांत खारगे, रोहीत ढवळे, बाळासाहेब महाराज आदी मान्यवर व श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळासाहेब नरारे सुत्रसंचलन प्रा. विष्णु शिंदे आभार संतोष पोतदार यांनी मानले.
करमाळा प्रतिनिधी दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात…
सांगोला प्रतिनिधी सांगोला नगरपालिका हद्दीमध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलाला दोन गुंठ्यापर्यंत बांधकाम परवाना व…
करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…
कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे,…
करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप…
करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून करमाळा तालुक्यातील पत्रकारिता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असून…