Categories: करमाळा

कृष्णा खोर्‍यातील पाणी उजनी कोळगाव धरणात येण्याचा सर्वाधिक लाभ करमाळ्याचाच . – प्रा.शिवाजी बंडगर प्रकल्पाचे जनक विजयसिंह पाटील यांचा शिवरत्नवर करमाळकरांच्या वतीने सत्कार!

करमाळा प्रतिनिधी 

कृष्णा भिमा स्थिरीकरण योजनेस काल राज्य सरकार ने 3326 कोटी रुपये मंजूर केले .त्यामुळे सहा जिल्हे आणि बत्तीस तालुक्यातील साडेपाच लाख हेक्टर शेतीला पाणी मिळणार आहे. याचा लाभ पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडय़ातील दुष्काळी भागाला होणार आहे. विशेषता हे पाणी क्रुष्णा खोर्‍यातून उजनी धरणात येवून पुढे सिना कोळगाव धरण मार्गाने मराठवाडय़ात जाणार असल्याने करमाळा तालुक्याला याचा सर्वाधिक लाभ होणार असल्याने धरणासाठी सर्वस्व त्यागणार्या उजनी व कोळगाव धरणग्रस्तासह संपूर्ण करमाळा तालुक्यालाच आनंद झाला असल्याचे प्रतिपादन उजनी धरणग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रा.शिवाजी बंडगर यांनी काल अकलुज येथे शिवरत्न बंगल्यावर बोलताना केले.

क्रुष्णा भिमा स्थिरीकरण योजनेस सरकारने काल निधी मंजूर केल्यानंतर या योजनेचे जनक माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा सन्मान करमाळा तालुक्याच्या वतीने शिवरत्न बंगला,अकलुज येथे करण्यात आला. या वेळी प्रा बंडगर बोलत होते. या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्या सविताराजे भोसले, सदस्य दिलीपदादा तळेकर , आदिनाथ चे माजी उपाध्यक्ष शहाजीराव देशमुख,माजी जिल्हापरिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे ,उदयसिंह मोरे पाटील, माजी संचालक संतोष खाटमोडे पाटील,वांगीचे माजी सरपंच विठ्ठल शेळके ,माणिकराव साखरे, शिवशंकर माने,महेंद्र पाटील, सरडे बापू,औदुंबर भोसले,अमरजीतसिंह साळुंके,महारूद्र पाटील, हनुमंत पाटील, आबा टापरे, चैतन्य पाठक,गणेश घोरपडे,बाळासाहेब महानवर आदि उपस्थित होते.

पुढे बोलताना बंडगर म्हणाले की,या योजनेस काहीनी विरोध करत खिल्ली उडवली होती . परंतु विजयसिंह मोहिते पाटील यानी आपली राजकीय ताकद पणाला लावली . सतत याचा पाठपुरावा चालूच ठेवला . प्रथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना साडे आठ लोकांच्या सहीचे निवेदन त्याना दिले. आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील यांनीही या योजनेचा ध्यास घेतला होता. या सर्वांच्या प्रयत्नाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी सकारात्मक प्रतिसाद दिला . अपुर्या पावसा मुळे उजनी तसेच कोळगाव धरण अनेकदा भरली जात नाहीत. त्यावेळी शेकडो एकर शेती धोक्यात येते. वीज कपातीच्या संकटाला सामोरे जावे लागते. क्रुष्णा खोर्‍यातील वाया जाणारे पाणी उजनी आणि कोळगाव धरणात येणार असल्याने ही समस्या निर्माण होणार नाही. रिटेवाडी उपसासिंचन सारखी योजना ही होवू शकते. त्यामुळे करमाळा तालुक्यातील सिंचन क्षेत्र वाढणार आहे.

चौकट- माजी उपमुख्य मंत्री विजयसिंह मोहिते पाटील याना क्रुष्णा भिमा स्थिरीकरण योजनेचे श्रेय मिळु नये म्हणून काहीनी या योजनेस खूप विरोध केला.पण विजयसिंह मोहिते पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील यानी याचा अविरत पाठपुरावा केला आणि आज निधी मंजूर झाला. करमाळा तालुक्याला याचा सर्वाधिक लाभ होणार आहे. सूर्य चंद्र असे पर्यंत विजयसिंह मोहिते पाटील यांच नाव या निमित्ताने आता घेतले जाईल.

शहाजीराव देशमुख
माजी उपाध्यक्ष आदिनाथ कारखाना.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटचे संस्थापक प्रा.डॉ महेश निकत यांची मेस्टा सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

  करमाळा प्रतिनिधी : महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (MESTA) यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय…

1 day ago

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

2 days ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

3 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

3 days ago