Categories: करमाळा

सोलापूर जिल्ह्यात दुष्काळीसदृश परिस्थितीमुळे पुणे भागातील धरणामधुन उजनी धरणात 10 टि एमसी पाणी सोडण्याची प्रा रामदास झोळसर यांची मागणी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा

करमाळा प्रतिनिधी सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण सध्या मायनसमध्ये गेल्यामुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे शेतकरी सर्वसामान्य जनता याकरिता पुणे भागातील 19 धरणातील दहा टीएमसी पाणी सोडण्यात यावे अशी मागणी करमाळा तालुक्याचे नेते प्रा. रामदास झोळसर यांनी अतुल कपोते कार्यकारी संचालक महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. सदर निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी मुख्य अभियंता जलसंपदा पुणे कार्यकारी संचालक महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळा पुणे उजनी धरण व्यवस्थापन भिमानगर जिल्हाधिकारी अहमदनगर यांना पाठवण्यात आले आहे.या निवेदनात असे म्हटले आहे की सोलापूर जिल्हा प्रशासनाने बार्शी, माळशिरस, सांगोला,माढा,करमाळा आदी तालुके दुष्काळग्रस्त तालुके म्हणून घोषित केले आहे यंदाच्या वर्षी उजनी धरण क्षेत्रात समाधानकारक रित्या पाऊस न झाल्याने उजनी धरणात 15%,, इतका अतिअल्प साठा शिल्लक आहे.उजनी धरणाच्या पाण्यावर सोलापूर जिल्ह्यातील व पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, दौंड आदी शहर व ग्रामीण भागाच्या पिण्याच्या उद्योगाचा व शेतीसाठीचा पाणी पुरवठा अवलंबून आहे.तसेच सोलापूर पुणे, नगर जिल्ह्यातील पेयजल योजनेअंतर्गत समावेश असलेल्या गावांना सुध्दा उजनी धरणातून पाणीपुरवठा केला जातो.आगामी येणाऱ्या पावसाळ्यापर्यंत सध्याची दुष्काळी परिस्थिती पाहता उजनी धरणातील पाणीसाठयावर सोलापूर, पुणे, नगर जिल्ह्यातील उपरोक्त बाबी अवलंबून असताना अतिअल्प राहिलेल्या पाण्याचे नियोजन कसे होणार आहे.यावर्षी महाराष्ट्र शासनाने जायकवाडी धरणात अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील पाणीसाठा कमी असुन देखील या धरणांमधुन 8.6 टी एम सी पाणी सोडण्यात आले आहे.पावसाळयात पुणे जिल्ह्यातील ज्या धरणाचे ओव्हरफ्लो झालेले पाणी उजनीत सोडले जाते.यंदा सर्व धरणे शंभर टक्के भरली आहेत.त्याच 19 धरणातील आता उजनीसाठी 10 टि एमसी पाणी जायकवाडी पॅटर्नप्रमाणे उजनीत सोडण्यात यावे.म्हणजेच यामुळे सोलापूर, पुणे,व नगर जिल्ह्यातील शेती, उद्योग, पिण्यासाठी लागणाऱ्या पाण्याच्या भविष्यात उदभवणाऱ्या अडचणी दूर होतील.उजनी धरणात पुणे जिल्ह्यातील 19धरणातुन 10 टि एमसी पाणी सोडण्याच्या बाबत संबंधीताची लवकरात लवकर बैठक घेऊन आमच्या मागणीचा सकारात्मक विचार व्हावा अन्यथा सिंचन भवन पुणे येथे निवेदन दिल्यापासून पंधरा दिवसांच्या आत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे प्राध्यापक रामदास झोळसर यांनी सांगितले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा

करमाळा प्रतिनिधी दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात…

19 hours ago

पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलासाठी ग्रीन झोनमध्ये 2 गुंठे क्षेत्राला बांधकाम परवाना द्यावा. अन्यथा 26 जानेवारी रोजी मा. सभापती सतीश सावंत यांचा उपोषणाचा इशारा

  सांगोला प्रतिनिधी सांगोला नगरपालिका हद्दीमध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलाला दोन गुंठ्यापर्यंत बांधकाम परवाना व…

20 hours ago

भाजप युवा मोर्चाच्या करमाळा तालुकाध्यक्षपदी शुभम बंडगर यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…

2 days ago

कोल्हापूरच्या पावणे चार वर्षाच्या साम्राज्य मराठे ची सह्याद्रीतील सर्वात कठीण लिंगाणा सुळक्यावर चढाई.

कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे,…

2 days ago

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माजी आमदार देशभक्त नामदेवरावजी जगताप यांची १०५ वी जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप…

2 days ago

करमाळा तालुक्यातील पत्रकारीता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असल्याने त्यांना सन्मानित करण्याचा ‌ सार्थ अभिमान- भरत भाऊ आवताडे

करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून करमाळा तालुक्यातील पत्रकारिता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असून…

3 days ago