कुंभैज प्रतिनिधी कुंभेज येथे 109 रक्तदात्यांनी केले ऊस्फुर्त रक्तदान केले आहे.कुंभेज येथील ज्योतिर्लिंग मंगल कार्यालयात सोलापूर जिल्हा शिवस्फूर्ती समूहाचे जिल्हाध्यक्ष अनिल कादगे यांचे वतीने जिजाऊ जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभाचे औचित्य साधत रक्तदान शिबीर घेण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान तब्बल 109 जणांनी रक्तदान केले. सोलापूर जिल्हास्तरीय कृषी पुरस्कार प्राप्त हर्षालीताई प्रशांत नाईकनवरे व आदर्श शिक्षीका सौ.रेखा शिंदे-साळुंके यांनी दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. उपस्थित सर्व मान्यवरांनी स्वराज्य जननी जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर जिजाऊ वंदन गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी व्यासपीठावर शिवस्फूर्ती समुहाचे जिल्हा अध्यक्ष अनिल कादगे यांचे समवेत प्रमुख पाहूणे हर्षालीताई नाईकनवरे, कुंभेजचे उपसरपंच संजय भाऊ तोरमल,आदर्श शिक्षिका रेखा शिंदे-साळुंके, प्रदेश उपाध्यक्ष अक्षय तळेकर, सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष नि.मेजर अक्रुर शिंदे , नि.सुभेदार मेजर बिभिषण कन्हेरे. प्रयोगशिल शेतकरी नानासाहेब साळुंके, पत्रकार गजेंद्र पोळ, प्रशांत नाईकनवरे, उदय देशमुख, पक्षीमित्र कल्याणराव साळुंके, कानिफनाथ गुटाळ, युवराज भोसले, नितीन भोसले, दत्ता रेगुडे, बाळासाहेब तोरमल, सुरेखा अनिल कादगे उपस्थित होते. रक्तदान शिबीरापूर्वी मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. – ऋषीकेश भोसले या तरुणाने अंगावर शहारे आणणारी गगनभेदी शिव गारद दिली. — कुंभेजचे उपसरपंच संजय तोरमल संवाद साधताना म्हणाले की, स्वराज्य जननी जिजाऊ मासाहेबांचा करारी बाणा अंगीकारत महिला भगिनींनी वाटचाल केल्यास आपले श्रेष्ठत्व निश्चित समाजमान्य होईल असे मत त्यांनी व्यक्त केले. आजी माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अक्रुर शिंदे यांनी सैन्यदलात शिवछत्रपतीच्या गनिमी कावा युध्दनितीचे व शिवगर्जनेचे सामर्थ्य याचे अनुभव सांगितले. —-जिजाऊंच्या वैशिष्टयपूर्ण वेशभुषेत इ. दहावीतील विद्यार्थिनी प्रणीता राजेंद्र गुटाळ ही कार्यक्रमाचे आकर्षण ठरली . संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब तोरमल यांनी केले. पक्षीमित्र कल्याणराव साळुंके यांनी तरुणांचा रक्तदानासारख्या विधायक कार्यातील ऊत्स्फुर्त सहभाग आदर्श व सर्वांना अनुकरणीय असल्याचे मत व्यक्त केले. या समारंभप्रसंगी मदार चित्रपटाचे दिग्दर्शक मंगेश बदर, यांनी रक्तदान शिबीरास भेट देत शुभेच्छा दिल्या. यावेळी विनोद कादगे, वैभव कादगे, ऋषीकेश भोसले, कुमार कादगे, आण्णासाहेब भोसले, लहू माने ऋषिकेश नलवडे, महावीर भोसले, श्रीराम शिंदे, गणेश सूर्वे, संदेश पोळ, महावीर भोसले, अमोल मुटके सर, प्रशांत पवार, सुहास पोळ, महादेव पोळ, रमेश सुरवसे, अतुल भोसले रवी काटे, प्रवीण चौगुले, अरविंद कन्हेरे, सुदेश माने, निखिल काळे, समाधान रगडे यांचे सह कुंभेज व परिसरातील तरुण मित्र मोठया संख्येने उपस्थित होते