Categories: करमाळा

बारामतीच्या ब्यूटीशियन अँड मेकअप आर्टिस्ट पुजा देशमुख यांना पुणे उद्योग भूषण २०२४ अंतर्गत “मेकअप आर्टिस्ट ऑफ दि इयर २०२४” हा मानाचा पुरस्कार प्रदान

बारामती प्रतिनिधी पुणे येथील स्विफ्ट न लिफ्ट संस्थेच्या वतीने पुणे जिल्ह्यातील विविध व्यावसायाला दिशा देणाऱ्या प्रमुख उद्योजक रत्नांचा गौरव करण्यात आला. बारामती मधील ऑरेंज मेकअप अँड ब्युटी स्कूल, बारामती च्या संस्थापक व ब्यूटीशियन अँड मेकअप आर्टिस्ट पूजा देशमुख यांना नामांकित पुणे जिल्ह्यातील पुणे उद्योग भूषण २०२४ अंतर्गत “मेकअप आर्टिस्ट ऑफ दि इयर” हा मनाचा पुरस्कार पुणे येथील समारंभात प्रदान करण्यात आला. मराठी सिनेअभिनेत्री सयाली संजीव यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. मुळच्या बेनवडी, ता. कर्जत यांनी गेल्या १० वर्षांपासून ब्युटी पार्लर व्यवसायापासुन सुरुवात करून अल्पावधि मध्ये बारामती च्या ब्युटी अँड मेकअप क्षेत्राला एक वेगळ्या उंचीवरती घेऊन जाण्याचा मानस बांधला आहे. त्या स्वतः स्थापित ऑरेंज स्किल्स फॉउंडेशन च्या अध्यक्ष असून त्यांनी बारामती पंचक्रोशीतील अनेक महिलांना प्रेरित आणि प्रशिक्षित करून त्यांच्या मनगटामध्ये सौंदर्यकार कलेने बळ दिले आहे. अनेकांच्या  जीवनात सुख समृद्धी आणण्यासाठी सौंदर्यशास्त्राच्या माध्यमातून आपल्या कलेच्या अविष्काराने अनेकांचे जीवन समृद्ध केले आहे. कर्जतसारख्या ग्रामीण भागातून बारामती सारख्या प्रगत जिल्ह्यामध्ये आपल्या कार्यकर्तृत्वाने यशाची शिखर गाठलेल्या मुळ जन्मभुमी असलेल्या कर्जतच्या  मानसकन्येचे सर्वत्र कौतुक होत आहे. कर्जतसाठी ही एक अभिमानाची गोष्ट असून  ग्रामीण भागातील मुलीही कुठल्याही क्षेत्रामध्ये शहरातील मुलींपेक्षा सरस असल्याचे पुजा देशमुख यांनी दाखवून दिले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

16 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

19 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

21 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago