करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्या चे पश्चिम भागातील ज्येष्ठ नेतेव मकाई साखर कारखान्याचे माजी संचालक श्री. महादेव गुंजाळ यांनी आज आमदार. संजयमामा शिंदे यांची निमगाव येथे प्रत्यक्ष भेट घेऊन, पश्चिम भागातील डिकसळ पुलाचे काम चालु झाले बाबत व इतर विकास कामांविषयी आनंद व्यक्त करीत बागल गटाला सोडचिट्ठी देत आमदार गटात जाहीर प्रवेश करीत असले बाबत सांगितले या प्रसंगी भगतवाडी येथील साधु तानवडे, पांडुरंग गुंजाळ तसेच पश्चिम भागातील युवा नेतृत्व केतुरचे माजी सरपंच ॲड. अजित विघ्ने, प्रशांत नवले उपस्थित होते. या प्रसंगी आपले मत व्यक्त करताना श्री. गुंजाळ यांनी सांगितले की मी माजी मंत्री डिगामामा बागल यांच्या बरोबर आजपर्यंत विश्वासाने राहुन राजकारण, समाजकारण केले, तसेच तालुक्यातील अनेक नेते मंडळींना वेळोवेळी निस्वार्थी पणे सहकार्य केले आहे. परंतु आजची परिस्थिती पाहता माझ्या अनेक कार्यकर्त्यांनी केलेल्या आग्रहा मुळे, तसेच माझ्या कार्यकर्त्यांची मकाई कारखान्याची बिले न मिळाल्याने झालेली हेळसांड पाहता मला हा निर्णय घेणे उचित वाटले. मी यापुढे माझे कार्यकर्त्या समवेत जाहीर कार्यक्रमात प्रवेश करून आमदार. संजयमामा शिंदे यांचे सोबत राहुन कार्यरत राहणार आहे. माझे भागातील सर्व नेतेमंडळी श्री. आप्पासो झांजुर्णे, श्री.
सुभाष गुळवे( आबा), तानाजी बापु झोळ,सुर्यकांत( भाऊ) पाटील, अॅड. अशोकराव गिरंजे , अशोक पाटील, राजेंद्र धांडे, बाळकृष्ण सोनवणे, ॲड. नितीनराजे भोसले, देवराव नवले, हनुमंत पाटील , सुहास गलांडे, डॉ.गुळवे व समस्त नेतेमंडळींच्या उपस्थितीत जाहीर कार्यक्रम घेणार असुन भव्य प्रवेश करणार आहे. असे सांगितले. पश्चिम भागातील या ज्येष्ठ असणारे नेत्याचे प्रवेशा मुळे निश्चितच आमदार संजयमामा शिंदे गटाची ताकद वाढणार असुन, पश्चिम भागातुन अजुन काही नेते आमदार गटात लवकरच प्रवेश करणार असले बाबत ॲड. अजित विघ्ने यांनी सांगितले.
करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…
कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे,…
करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप…
करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून करमाळा तालुक्यातील पत्रकारिता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असून…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील विद्या विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देशभक्त स्वर्गीय नामदेवरावजी जगताप यांची 105…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा पोथरे येथे ज्ञानज्योती फातिमाबी शेख यांची जयंती साजरी करण्यात आली…