करमाळा प्रतिनिधी कुणबी मराठा समाज एकच असून समाजाला सरसकट आरक्षण देण्याची गरज असून मनोज जरांगे पाटील यांची मागणी योग्य असुन शासनाने केंद्र शासनाकडून आरक्षण मर्यादा वाढवून घेऊन मराठा समाजाला कुणबी म्हणून ओबीसी मधुन आरक्षण द्यावे असे मत दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक रामदास झोळसर यांनी व्यक्त केले. मराठा समाजाला ओबीसीमध्ये सरसकट आरक्षण द्यावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील असंख्य मराठा समाज बांधव यांच्याबरोबर मुंबई वारीस निघाले असुन त्यांना समर्थन देण्यासाठी समाज बांधवाबरोबर सहभागी होणार असून करमाळा तालुक्यातील पन्नास हजार मराठा बांधव जाणार असून आपणही खारीचा वाटा उचलून शंभर गाड्या देणार आहे. एकच मिशन मराठा आरक्षण यासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई वारीस जाण्यासाठी करमाळा येथील मराठा समाज नियोजन बैठकीत व्यक्त केले. पुढे बोलताना झोळ सर ते म्हणाले की मराठा समाजाला शैक्षणिक समानतेच्या धोरणासाठी आरक्षणाची गरज आहे .एकीकडे मराठा समाजाचा 85 टक्के वाला मुलगा फी भरून शिक्षण घेतो तर दुसरीकडे 50% वाला आरक्षणामुळे शैक्षणिक शिष्यवृत्ती घेऊन शिक्षण घेतो ही मोठी तफावत आहे. सध्याच्या काळात मराठा समाजाची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे .ठराविक दहा टक्के श्रीमंत लोक सोडल्यास शेती शेतमजूर कष्टकरी करणारा मराठा समाज आहे .त्याची परिस्थिती सर्व राजकीय मंडळींना माहित आहे . मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे मराठा ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना समानतेच्या धोरणावर शिष्यवृत्ती वस्तीगृह भत्ता याकरिता एक हजार कोटीची तरतूद करण्यात आली आहे.ही बाब मराठा ओबीसी समाजाला दिलासा देणारी आहे. त्यामुळे आपसात वाद विवाद करण्यापेक्षा मराठा व ओबीसी समाजानै एकत्र येऊन शैक्षणिक सवलती घेण्यासाठी एकत्र लढा देण्याची गरज आहे.सर्वात जास्त आमदार जरी मराठा समाजाचे असले तरी त्यांना मराठा समाजाच्या काही देणे घेणे नाही त्यांना फक्त आपली राजकीय पोळी भाजण्यात आनंद वाटत आहे .निवडणुकीच्या वेळी मराठा समाजाचा म्हणून सहानुभूती मिळवण्यापलीकडे एकही लोकप्रतिनिधी मराठा आरक्षणाच्या बाबतीत आवाज उठवण्यास तयार नाही ही मोठी शोकांतिकी आहे. दुसरीकडे मराठा व ओबीसी असा वाद निर्माण केला जात आहे .मराठा समाज कुणबी म्हणून ओबीसीमध्ये आल्यावर आपले राजकीय आरक्षण रद्द होईल अशी भीती काही राजकीय मंडळींना वाटत आहे जे समाजाच्या नावाखाली स्वतःची झोळी भरण्याचे काम करत आहेत. त्यांना आज आपल्या अस्तित्वासाठी आपला समाज आठवतो आहे. वास्तविक पाहता मराठा व ओबीसी समाज हा एकाच नाण्याच्या दोन बाजू असून मराठा हा कुणबी म्हणून पहिल्यापासून ओबीसी मध्येच आहे .फक्त पुर्वपार लोकांच्या अशिक्षितपणामुळे काही जणांची नोंद साक्षर नसल्याने पुरावा निघत नसल्यामुळे त्यांची जात मराठा राहिली आहे. त्यामुळे ओबीसी समाजानेही आपली माथी भडकवणाऱ्या नेत्यांचे न ऐकता मराठा ओबीसी एकच असल्याची दाखवून द्यावे. तुमचा मोठा भाऊ मराठा कुणबी असल्याचे लक्षात घ्यावे .कारण आता ही एक आरपारची लढाई झाली आहे. नुसते मोर्चे काढून उपोषण धरणे आंदोलन चक्का जाम करून धरणे आंदोलन करून सरकारवर दबाव आणता येईल. परंतु सरकारने त्या दृष्टीने कायदेशीर पावले उचलून मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालानुसार मराठा समाजाचे सर्वेक्षण करून मराठा व कुणबी एकच असल्याचा दाखला देऊन केंद्राकडून मराठा समाजाच्या लोकप्रतिनिधीनी मराठा व कुणबी एकच असल्याची मागणी मान्य करून मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण मिळवून द्यावे हीच सध्या काळाची गरज आहे. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण घ्यावे अशी ओबीसी नेत्यांची मागणी आहे .इंद्रा साहनी प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 50%आरक्षणाची मर्यादा आखण्यात आली होती ती मर्यादा ओलांडली आहे. . ई डब्लु एसमध्ये दहा टक्के आरक्षण देऊन सध्या 52% असे एकुण जास्त 62% आरक्षण असुन आरक्षणाची मर्यादा ओलांडली आहे. स्वतंत्र आरक्षण देण्याची सरकारची भूमिका दिशाभूल करणारी आहे.निवडणुकीचा फार्स करण्याचा डाव आहे असे आरक्षण देता येत नाही. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीमध्ये कुणबी व कुणबी मराठा एकच असून मराठा समाजाला सरसकट ओबीसी मध्ये आरक्षण द्यावे हीच मागणी योग्य असल्याचे त्यांनी सांगितले.मनोज जरांगे पाटील धडाडीचे नेतृत्व मराठा समाजाला लाभले आहे . निस्वार्थीपणे समाजासाठी ते जिवाचे रान करून आरक्षण मागणी मान्य करण्यासाठी आपल्या प्राणाची बाजी लावत आहे त्यांना खऱ्या अर्थाने पाठबळ देणे गरजेचे असून मराठा समाजाने आता ही आपली लढाई म्हणून यात भाग घेतल्या पाहिजे लोकप्रतिनिधींनी ही आपण समाजाचे काहीतरी देणे लागू लागतो या भावनेतून या लढ्यात सहभागी होऊन सरकारकडे या मागणीचा पाठपुरावा करून मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…
कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे,…
करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप…
करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून करमाळा तालुक्यातील पत्रकारिता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असून…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील विद्या विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देशभक्त स्वर्गीय नामदेवरावजी जगताप यांची 105…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा पोथरे येथे ज्ञानज्योती फातिमाबी शेख यांची जयंती साजरी करण्यात आली…