Categories: करमाळा

मकाई साखर कारखान्याचे थकीत ऊस बिल पंचवीस जानेवारीपर्यंत न मिळाल्यास 26 जानेवारीला शेतकरी बांधवांसह सामूहिक आत्मदहन करणार – प्रा.रामदास झोळसर

करमाळा प्रतिनिधी मकाई सहकारी साखर कारखान्याचे थकीत ऊस बिल मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या सूचनेनुसार आम्ही बिल मिळण्यासाठी 25 जानेवारीपर्यंत वाट बघु अन्यथा 26 जानेवारीला करमाळा तहसील कार्यालयावर आम्ही शेतकरी कुटुंबासह आत्मदहन आंदोलन करणार असल्याचे प्राध्यापक रामदास झोळसर यांनी बैठकीत बोलताना सांगितले. या संदर्भात शेतकरी बांधवांसमवेत झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांच्यावतीने तहसीलदार पोलीस निरीक्षक करमाळा यांना देण्यात आले असून सदर निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जिल्हाधिकारी सहकार मंत्री सहकार आयुक्त महाराष्ट्र राज्य साखर संघ यांना देण्यात आले आहे . या निवेदनात असे म्हटले आहे की शेतकरी वर्गामध्ये ऊस बिल न मिळाल्यामुळे तीव्र असंतोष पसरला असून आर्थिक अडचणी दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांची अवस्था न घर का घाट का अशी झाली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी सहकुटुंब आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे 25, जानेवारीपर्यंत बिल मिळणे ही काळाची गरज आहे. मकाई सहकारी साखर कारखान्याच्या थकीत बिल मिळण्यासाठी 16 जानेवारीला करमाळा येथील शासकीय विश्रामगृहात बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीला शेतकरी कामगार पक्षाचे नेते दशरथ कांबळे ॲड राहुल सावंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र गोडगे, अंजनडोहचे माजी उपसरपंच शहाजी माने, प्रा. राजेश गायकवाड सर, हरीदास मोरे, वाशिंबेचे माजी सरपंच भगवान डोंबाळे, गणेश वाळुंजकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ऊस उत्पादक शेतकरी ऊस वाहतूकदार यांची बैठक संपन्न झाली.यावेळी पुढे बोलताना प्राध्यापक रामदास झोळसर म्हणाले की आम्ही गेल्या दोन महिन्यांपासून मकाईचे थकीत ऊस बिल मिळण्यासाठी सामुहिक लढा देत आहे . या बैठकीत बोलताना शेतकरी कामगार नेते दशरथ अण्णा कांबळे म्हणाले की मकाई सहकारी साखर कारखान्याच्या ऊस बिलासाठी शेतकरी कष्टकरी वर्गासाठी आम्ही लढा देत आहोत यात आम्ही कुठलेही राजकारण न करता ‌ आमची ही लढाई अन्याविरुद्धची लढाई आहे. शेतकऱ्यांच्या घामाचे पैसे त्यांना 25 तारखेपर्यंत द्या आम्ही भर चौकामध्ये आपल्या सत्कार करू असे आवाहन त्यांनी दिग्विजय बागल यांना केले आहे .पण अन्यायाविरुद्द शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नसल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीमध्ये कामगार नेते ॲड राहुल सावंत म्हणाले की आम्ही मकाई सहकारी साखर कारखान्याच्या थकीत ऊस बिलासाठी दोन महिन्यापासून सामूहिक लढा देत आहे.शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नका.तुमचे पैसे तुम्हाला मिळवून दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही.आपण न्यायालयीन लढा देत कारखाना चेअरमन संचालक मंडळ यांच्या मालमत्तेवर बोजा चढून मालमत्ता विकून आपले पैसे हे वसूल करू फक्त तुम्ही या लढ्यामध्ये हार न मानता खंबीरपणे उभे रहा लवकरच आपल्या लढ्याला यश मिळणार आहे.आता ही आरपारची लढाई अंतिम टप्प्यात असून आपला विजय निश्चित असल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र गोडगे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की जोपर्यंत आपण संघर्षाची भूमिका घेत नाही तोपर्यंत आपल्याला यश‌ मिळणार नाही.आपली लढाई आपणास लढावी लागणार आहे तुम्ही मनात भिती न बाळगता आपल्या हक्कासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या लढ्यात सहभागी होऊन लढा देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीला मकाई सहकारी साखर कारखान्याचे ऊस उत्पादक शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. मकाई थकीत ऊस बिलाबाबत प्रशासनाला निवेदन देऊन आपला असंतोष त्यांनी व्यक्त केला असून 25 जानेवारी पर्यंत ऊस बिल न दिल्यास उग्र आंदोलनाचे रूप धारण करून सहकुटुंब 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त सामुहिक आत्मदहन करणार असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

भाजप युवा मोर्चाच्या करमाळा तालुकाध्यक्षपदी शुभम बंडगर यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…

17 hours ago

कोल्हापूरच्या पावणे चार वर्षाच्या साम्राज्य मराठे ची सह्याद्रीतील सर्वात कठीण लिंगाणा सुळक्यावर चढाई.

कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे,…

1 day ago

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माजी आमदार देशभक्त नामदेवरावजी जगताप यांची १०५ वी जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप…

1 day ago

करमाळा तालुक्यातील पत्रकारीता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असल्याने त्यांना सन्मानित करण्याचा ‌ सार्थ अभिमान- भरत भाऊ आवताडे

करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून करमाळा तालुक्यातील पत्रकारिता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असून…

2 days ago

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात सोलापूर जिल्हयाचे भाग्यविधाते देशभक्त कै.नामदेवरावजी जगताप यांची १०५ वी जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील विद्या विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देशभक्त स्वर्गीय नामदेवरावजी जगताप यांची 105…

2 days ago

करमाळा तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा पोथरे येथे ज्ञानज्योती फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा पोथरे येथे ज्ञानज्योती फातिमाबी शेख यांची जयंती साजरी करण्यात आली…

2 days ago