Categories: करमाळा

कुणबी मराठा नोंद असलेली मोडीलिपित असणारी करमाळा तालुक्यातील गावनिहाय यादी प्रशासनाने मराठीत प्रसिद्ध करण्याची संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश कुकडे यांची मागणी

करमाळा प्रतिनिधी कुणबी मराठा समाजाची कुणबी नोंद असलेली आडनाव गावनिहाय यादी प्रशासनाने जाहीर केली आहे ती यादी मोडी लिपीत असल्याने नागरिकांना ‌ समजण्यासाठी अडचण येत आहे त्यामुळे मोडी लिपीतून ‌ मराठी भाषांतर करून ‌ मराठीमध्ये यादी जाहीर करावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश कुकडे यांनी केली आहे. बाबत अधिक बोलताना त्यांनी असे सांगितले की कुणबी मराठा समाजाचे गावनिहाय  सर्वेक्षण शासनाकडून करण्यात आले असून गावनिहाय यादीही शासनामार्फत पीडीएफ स्वरूपात देण्यात आली आहेज ही यादी  मोडी लिपी मध्ये असल्याने नागरिकांना आपल्या कुणबी ची नोंद समजत नाही त्यामुळे मोडी लिपी वाचकांकडून शहानिशा करून सरकारी अधिकाऱ्यांनी प्रामाणित स्वरूपात गावनिहाय आडनावानुसार मराठी मध्ये यादी प्रसिद्ध करावी तसेच त्या यादीचा गावानुसार फलक तहसील कार्यालयाच्या बोर्डवर लावा जेणेकरून नागरिकांची गैरसोय होणार नाही.  खऱ्या अर्थाने कुणबी मराठा असलेल्या मराठा समाजाला न्याय मिळेल व नागरिकांच्याही कुणबी नोंद असल्याच्या तकरींना आपणाला सामोरे जावे लागणार नाही. याची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन कुणबी नोंद असलेले कुटुंब आडनाव  गावनिहाय करमाळा शहराची यादी मराठीमध्ये प्रसिद्ध करण्याचे आवाहन संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश कुकडे यांनी केले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

15 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

18 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

19 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago