Categories: Uncategorized

आदिनाथ कारखाना चालू करण्यासाठी सभासद मा. रणजीतदादांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतील-औंदुबरराजे भोसले पाटील

करमाळा प्रतिनिधी आदिनाथ कारखाना चालू करण्यासाठी सभासद मा रणजीतदादांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतील असा विश्वास सभासद व नेरलेचे मा सरपंच औदुंबरराजे भोसले यांनी व्यक्त केला* प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकार द्वारे माऔदुंबरराजे म्हणतात आदिनाथ सहकारी साखर कारखाना ची मुहूर्तमेढ सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साहेब यांनी रोवली आहे .त्यांचे सहकारी गोविंद बापू पाटील यांनी अनेक वर्ष पायात चप्पल घातली नाही .यांच्यासारखे असंख्य कार्यकर्त्यांनी त्यांना साथ देऊन हा कारखाना अनेक वर्षांनी सुरू झाला व तालुक्यातील उसाचा प्रश्न मिटला.हा कारखाना सुरू सहकार महर्षींनी केला.परंतु या कारखान्याचा विस्तार स्वर्गीय दिगंबरमामा बागल यांनी केला.सांप्रदायमध्ये म्हणतात,,ज्ञानदेवे रचला पाया तुका झालासी कळस,,सहकार महर्षी रचले पाया मामा झालासी कळस, त्याप्रमाणे त्यांनी क्षमता वाढवली प्रशासकीय इमारत निर्माण केली ज्या सहकार महर्षीनी कारखाना उभा केला.त्यांचा सोलापूर जिल्ह्यातील सर्व पुतळ्यापेक्षा जास्त उंचीचा पुतळा कारखान्यावर उभा केला.त्याच्या अनावरणासाठी विस्तारीकरणाचा व प्रशासकीय इमारतीच्या शुभारंभ साठी सहकार महर्षीचे सहा पुत्रांना सहकुटुंब आमंत्रित केले .अनेक वर्षे कारखाना मा.विजयदादांच्या व मा.प्रतापसिंह पप्पांच्या नेतृत्वाखाली उत्तम प्रकारे चालवला ,बागल मामांच्या अकाली निधनानंतर कारखान्याची निवडणूक झाली त्या निवडणुकीस मोहिते पाटील विरुद्ध बागल असे दाखवले गेले.परंतु वस्तुस्थिती मात्र सत्ताधारी संचालक मंडळ विरुद्ध बागल गट अशी होती, सत्ताधाऱ्यावर सभासद जनता थोडेफार नाराज होत असते ,त्यामुळे व बागल मामांच्या सहानभूतीमुळे सत्ताधारी गटाचा पराभव झाला आणि बागल गटाचा विजय झाला मोहिते पाटलाचा काही संबंध नसताना संबंध जोडला गेला.बागल गटाने देखील कारखाना उत्तम प्रकारे चालवला माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी चेअरमन असताना देखील चार अंकी भाव देण्याचा शब्द पाळला होता.परंतु पुढे सरकारच्या काही चुकीच्या धोरणामुळे व जिल्हा बँक अडचणीत आल्यामुळे बँकेकडून होणारी मदत होऊ शकली नाही.त्यामुळे कारखान्याला अडचणी निर्माण झाल्या गेल्यावर्षी चेअरमन धनंजय डोंगरे मा.रश्मी दिदी बागल मा.दिग्विजय बागल व तालुक्यातील अनेक सभासदांच्या विचाराने सहभागाने बंद असणारा खूप अडचणीत असणारा कारखाना सुरू झाला.आणि यावर्षी देखील शासन नियुक्त संचालक महेश चिवटे यांनी कारखाना सुरू केला शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी कारखाना सुरू करणे म्हणजे खूप मोठे कौतुक करण्यासाठी गोष्ट आहे .मी या निवेदनाच्या माध्यमातून सभासदच्या नात्याने कोण कोणत्या पार्टीचे पक्षाचे गटाचे आहे .यापेक्षा चांगले काम करणाऱ्याचे कौतुक केले पाहिजे या उद्देशाने त्यांचे जाहीर कौतुक करतो आज कारखाना खूप अडचणीत आहे.कारखान्याच्या बाबती सरकार कोणताही निर्णय घेऊ शकते .त्यामुळे कारखाना वाचण्यासाठी काहीतरी उपाययोजना महत्त्वाची आहे.कारखाना बंद असल्यामुळे तालुक्यातील ऊस उत्पादकाच्या खूप अडचणी निर्माण झाले आहेत कारखानदार नेते तालुक्यातील काही लोकांचा ऊस मुद्दाम तोडू देत नाहीत.जिल्ह्याचे पालकत्व असणारे कुटुंब म्हणून मोहिते पाटील घराण्याकडे पाहिले जाते जिल्ह्यातील कोणत्याही गावातील तालुक्यातील व्यक्ती विश्वासाने मोहिते पाटलाला आपली अडचण किंवा काम सांगू शकते तसे काम किंवा अडचण जिल्ह्यातील इतर कोणत्याही नेत्यांना नागरिक सांगू शकत नाहीत.त्यामुळे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी त्यांचे आजोबा सहकार महर्षींनी स्थापन केलेला कारखाना पूर्व पदावर आणावा अशी इच्छा सामान्य जनतेतून सभासदांमधून व्यक्त व्यक्त होत आहे.त्यासाठी आम्ही सर्व सभासद तालुक्यातील जनता नेते त्यांच्या पाठीमागे खंबीर उभे राहू असा विश्वास सर्वांनी मोहिते पाटील यांना दिला आहे.यावर्षी देखील काही उपाययोजना करून कारखाना चालू राहिला तर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उसाचा निर्माण झालेला प्रश्न सुटेल असा विश्वास हिंदवी स्वराज्य ग्रुपचे संस्थापक व नेरलेचे मा.सरपंच औदुंबरराजे भोसले यांनी कोणताही राजकीय उद्देश व द्वेष नठेवता व्यक्त केले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

मुख्याधिकाऱ्यांच्या पत्रानंतर निदर्शन आंदोलन स्थगित- वैभवराजे जगताप.

करमाळा - प्रतिनिधी शहरातील पाणीपुरवठा, रस्ते व स्वच्छता यासह इतर समस्या सोडवण्यासाठी गुरुवार दिनांक ८/१०/२०२६…

2 days ago

भाजपा सोलापूर ग्रामीण पश्चिमची करमाळा येथे ‘विकसित भारत संकल्प सभा’ उत्साहात संपन्न पदयात्रेला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,

  करमाळा प्रतिनिधी :- देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी सोलापूर…

3 days ago

करमाळा बाजार समितीमध्ये आमदार राजाभाऊ राऊत यांचा सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी बार्शी विधानसभा मतदारसंघाचे विधान परिषदेचे आमदार राजाभाऊ राऊत यांचा करमाळा येथील…

3 days ago

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

6 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

7 days ago