Categories: करमाळा

करमाळ्यात तुरीला उच्चांकी १००६६ रु प्रतिक्विंटल दर – माजी आमदार जयवंतराव जगताप :

करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमधे शुक्रवारी तुरीला उच्चांकी १०,०६६ रु . प्रतिक्विंटल दर मिळाला असून शेतकऱ्यांनी आपली तूर करमाळा बाजार समितीत विक्रीस आणावी असे आवाहन माजी आमदार तथा बाजार समितीचे सभापती जयवंतराव जगताप यांनी केले आहे . याबाबत अधिक माहिती देताना माजी आ .जगताप यांनी सांगितले कि , शुक्रवारी करमाळा येथे पांढऱ्या तुरीची तब्बल २००० कट्टे आवक झाली असून १००६६ / – रू प्रति क्विंटल इतका उच्चांकी दर मिळाला असून सरासरी ९८०० / – रू . तुरीला दर मिळाला आहे . त्याचबरोबर ज्वारीला कमाल ५४८१ / – सरासरी ४२०० / – रु . दर व हरभऱ्याला कमाल ५००१ / – सरासरी ४८५१/- दर मिळाला आहे .करमाळा बाजार समितीचा गेली ७५ वर्षापासून भुसार शेतमाल विक्रीसाठी विश्वसनीय बाजार पेठ म्हणून आसपासच्या ४ते ५ जिल्ह्यात लौकिक आहे . शेतकऱ्यांसमक्ष उघड लिलाव , २४ तासात मापे व मालविक्रीची पट्टी मिळत असल्यामुळे करमाळ्यात तुर , ज्वारी , उडीद , हरभरा , मका , बाजरीची आवक मोठ्या प्रमाणात होते . चालू हंगामात शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभावापेक्षा जादा दर मिळत असून शेतकऱ्यांनी आपला शेतमाल विक्रीस आणावा असे आवाहन माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी केले आहे .

saptahikpawanputra

Recent Posts

मुख्याधिकाऱ्यांच्या पत्रानंतर निदर्शन आंदोलन स्थगित- वैभवराजे जगताप.

करमाळा - प्रतिनिधी शहरातील पाणीपुरवठा, रस्ते व स्वच्छता यासह इतर समस्या सोडवण्यासाठी गुरुवार दिनांक ८/१०/२०२६…

2 days ago

भाजपा सोलापूर ग्रामीण पश्चिमची करमाळा येथे ‘विकसित भारत संकल्प सभा’ उत्साहात संपन्न पदयात्रेला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,

  करमाळा प्रतिनिधी :- देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी सोलापूर…

2 days ago

करमाळा बाजार समितीमध्ये आमदार राजाभाऊ राऊत यांचा सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी बार्शी विधानसभा मतदारसंघाचे विधान परिषदेचे आमदार राजाभाऊ राऊत यांचा करमाळा येथील…

3 days ago

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

6 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

7 days ago